adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दिल्लीतील कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ कौमी एकता फाउंडेशनचा मोर्चा; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

दिल्लीतील कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ कौमी एकता फाउंडेशनचा मोर्चा; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन  फैजपूर : इदू पिंजारी (संपादक -:- हेमका...

दिल्लीतील कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ कौमी एकता फाउंडेशनचा मोर्चा; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन 


फैजपूर : इदू पिंजारी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दिल्लीतील २० जुलै २०२६ रोजी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ कौमी एकता फाउंडेशन, फैजपूर यांच्या वतीने निषेध मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी, फैजपूर यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर झालेल्या कथित लाठीमार व अश्रुधूराच्या वापराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच आंदोलनकर्त्यांच्या विविध मागण्या तातडीने मान्य कराव्यात आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली. 


यावेळी कौमी एकता फाउंडेशनचे अध्यक्ष शेख कुर्बान, सचिव जाविद जनाब, उपाध्यक्ष असगर दादा, इरफान, शेख हमीद, आवेश भांजा, वंचित बहुजन आघाडीचे शमीभा पाटील, महाले सर, संविधान आर्मीचे आरिफ भाऊ, एम.पी.जे.चे अहमद दादा, वसीम जनाब, शकील दादा, सुलतान भाऊ, अख्तर पहेलवान, रझाक भाऊ, गुड्डू भाऊ, जफर अली यांच्यासह फाउंडेशनचे असंख्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी "धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा", "जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है" तसेच "भारतीय संविधान जिंदाबाद" अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. निवेदन उपविभागीय अधिकारी, फैजपूर यांच्या मार्फत शासनाकडे पाठविण्यात आले.

No comments