adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्यानगरमध्ये LCB चे भयानक धाडसत्र..! 18 ठिकाणी छापे लाखोंचा मुद्देमाल हस्तगत दारू अन् जुगार माफियांमध्ये प्रचंड खळबळ..!

  अहिल्यानगरमध्ये LCB चे भयानक धाडसत्र..! 18 ठिकाणी छापे लाखोंचा मुद्देमाल हस्तगत दारू अन् जुगार माफियांमध्ये प्रचंड खळबळ..!  सचिन मोकळं अहि...

 अहिल्यानगरमध्ये LCB चे भयानक धाडसत्र..! 18 ठिकाणी छापे लाखोंचा मुद्देमाल हस्तगत दारू अन् जुगार माफियांमध्ये प्रचंड खळबळ..! 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर :- जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि जुगाराचे अड्डे चालवणाऱ्या माफियांविरुद्ध पोलीस प्रशासनाने अतिशय आक्रमक व धडक कारवाई सुरू केली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने धाडसी मोहीम राबवून संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी तब्बल १८ ठिकाणी छापे टाकले.या धडक कारवाईत एकूण १,५०,१२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.​पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.संतोष मुटकुळे यांनी तातडीने सूत्रे हलवली.त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश भोये,पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, विकास जाधव,कृष्णकुमार सेदवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या ३० हून अधिक पोलीस अंमलदारांचा समावेश असलेली ५ विशेष पथके तयार केली.​दि.२७ जुलै २०२६ रोजी या पथकांनी अत्यंत गोपनीय रीतीने माहिती गोळा करून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी धडक कारवायांचा धडाका लावला.अवैध दारू विक्रीविरुद्ध कारवाई (एकूण १० गुन्हे | रु. १,२८,८५०/-),​सोनई पोलीस ठाणे: ०५ छापे  जप्त मुद्देमाल: २७,१९०/- रुपये,​राहुरी पोलीस ठाणे: ०२ छापे | जप्त मुद्देमाल: २०,४००/- रुपये,​बेलवंडी पोलीस ठाणे:०२ छापे | जप्त मुद्देमाल: ७४,५३०/- रुपये,​कर्जत पोलीस ठाणे:०१ छापा  जप्त मुद्देमाल: ६,७३६/- रुपये,अवैध जुगार अड्ड्यांविरुद्ध कारवाई (एकूण ०८ गुन्हे | रु. २१,२७०/-),​तोफखाना पोलीस ठाणे:०४ छापे | जप्त मुद्देमाल: १५,९७०/- रुपये

​कोतवाली पोलीस ठाणे: ०४ छापे जप्त मुद्देमाल: ५,३००/- रुपये,​एकूण दाखल गुन्हे: १८ गुन्हे (१० दारू विक्री + ०८ जुगार) ​एकूण जप्त मुद्देमाल: १,५०,१२०/- रुपये ​स्थानिक गुन्हे शाखेच्या या वादळी कारवाईमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यातील सर्व प्रकारचे बेकायदेशीर धंदे समूळ नष्ट करेपर्यंत स्थानिक गुन्हे शाखेकडून अशाच प्रकारची कडक अन् सतत कारवाई पुढेही चालूच राहील. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि/श्री संतोष मुटकुळे,सपोनि/हरिष भोये,पोउपनि/अनंत सालगुडे, पोलीस उपनिरीक्षक  विकास जाधव,पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड,​पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे,निलकंठ कारखिले, योगेश भिंगारदिवे,अरविंद भिंगारदिवे,सुनिल पवार, गणेश धोत्रे,शाहिद शेख, बाळासाहेब नागरगोजे,रिचर्ड गायकवाड,सोमनाथ झांबरे, शामसुंदर जाधव,अशोक लिपणे,भिमराज खर्से,योगेश कर्डिले,प्रमोद जाधव,विशाल तनपुरे,भगवान थोरात,मनोज साखरे,अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, भाऊसाहेब काळे,सुनिल मालणकर,रोहित येमुल,सागर ससाणे,अमोल आजबे,सतिष भवर,चालक चंद्रकांत कुसळकर,अरुण मोरे यांनी केली आहे.

No comments