एकीकडे रुग्णसेवा, दुसरीकडे सन्मान; एकनिष्ठा फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा गौरव पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) खामगाव : ...
एकीकडे रुग्णसेवा, दुसरीकडे सन्मान; एकनिष्ठा फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा गौरव
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव : समाजातील गरजू, दिव्यांग व नेत्रहीन रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या एकनिष्ठा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुरजभैय्या यादव यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांचा रविवारी सकाळी ११ वाजता आरोग्यम वेलनेस सेंटर, खामगाव येथे विशेष सत्कार करण्यात आला.
सुरजभैय्या यादव हे अनेक वर्षांपासून गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत, रक्तदानासाठी समन्वय, दिव्यांग व नेत्रहीन नागरिकांच्या अडचणी सोडविणे तसेच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे निस्वार्थपणे सेवा देत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आरोग्यम वेलनेस सेंटरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी नंदकिशोर पुरी यांच्या हस्ते सुरजभैय्या यादव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या रुग्णसेवा, आरोग्य जनजागृती आणि समाजहिताच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमास गोपाल टेंभे, अजय वेरूळकर, चेतन कदम, अमर यादव, गौरव कवटेकर, प्रदीप शमी, पंकज अंबारे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना सुरजभैय्या यादव म्हणाले, "समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा असून ही सेवा आम्ही अखंडपणे करत राहू."
कार्यक्रमाचे आयोजन आरोग्यम वेलनेस सेंटर, खामगाव यांच्या वतीने करण्यात आले होते. उपस्थितांनी सुरजभैय्या यादव यांच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments