adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड साठी बोटांचे ठसे येत नाही त्यासाठी उपाययोजना/पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी

 अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड साठी बोटांचे ठसे  येत नाही त्यासाठी उपाययोजना/पर्यायी  व्यवस्था करण्याची मागणी  किरण धायले मुक्ताईनगर ...

 अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड साठी बोटांचे ठसे  येत नाही त्यासाठी उपाययोजना/पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी 


किरण धायले मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

राज्य परिवहन महामंडळातर्फे बस मध्ये प्रवास करताना सवलतीसाठी  NCMC कार्ड एक ऑगस्ट 2026 पासून सक्तीचे करण्यात आले आहे.

        अमृत ज्येष्ठ नागरिक यांचे हाताचे किंवा बोटाचे ठसे फिंगरप्रिंट येत नाही त्यांचे वय 75 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा नागरिकांसाठी विशेष बाब म्हणून एसटी महामंडळाने पर्यायी व्यवस्था तयार करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांनी केली आहे.

             त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, संजय स्वावलंबन व निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा अनेक योजनांमध्ये ज्यांच्या हात ,बोटांचे फिंगरप्रिंट्स येत नाही त्यासाठी सुद्धा शासनातर्फे उपाययोजना करण्यात यावी व ज्येष्ठ नागरिक यांचे पगार वेळेवर व्हावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांत करण्यात येत आहे.

No comments