लायन्स क्लब दापोलीच्या अध्यक्षपदी गुरुप्रसाद बेर्डे यांची निवड... किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ◾दापोली :- दापोलीतील स...
लायन्स क्लब दापोलीच्या अध्यक्षपदी गुरुप्रसाद बेर्डे यांची निवड...
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
◾दापोली :- दापोलीतील सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी क्षेत्रात सक्रिय कार्यरत असलेले गुरुप्रसाद प्रकाश बेर्डे यांची लायन्स क्लब दापोलीच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
अध्यक्षपदाचा शपथविधी समारंभ शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी पितांबरी रुचियाना रेस्टॉरंट येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गुरुप्रसाद बेर्डे हे दापोलीचे रहिवासी असून त्यांचे संपूर्ण शिक्षण दापोली येथे झाले आहे. त्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथून सन २००४ मध्ये कृषी पदवी प्राप्त केली आहे. सध्या ते वसई येथे "वैतरणा डेअरी" या नावाने दूध पुरवठा व्यवसाय करीत असून पितांबरी कंपनीमध्येही कार्यरत आहेत.
समाजसेवेचे बाळकडू लाभलेल्या गुरुप्रसाद बेर्डे यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत समाजहितासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत लायन्स क्लब दापोलीने त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली लायन्स क्लब दापोलीमार्फत आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, रक्तदान, गरजूंना मदत तसेच विविध लोकहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविले जातील, असा विश्वास क्लबच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.
गुरुप्रसाद बेर्डे यांच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यकाळात लायन्स क्लब दापोलीच्या सेवाभावी कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments