चोपडा तालुक्यातील ऋषिराज बाविस्करचा NEET-2026 मध्ये घवघवीत यश; 720 पैकी 206 गुण मिळवून डॉक्टर होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वी वाटचाल चोपडा ...
चोपडा तालुक्यातील ऋषिराज बाविस्करचा NEET-2026 मध्ये घवघवीत यश; 720 पैकी 206 गुण मिळवून डॉक्टर होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वी वाटचाल
चोपडा (प्रतिनिधी) :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-2026) चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, चोपडा तालुक्यातील निमगव्हान येथील ऋषिराज धनराज बाविस्कर याने 720 पैकी 206 गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या या यशामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ऋषिराज हा धनराज आधार बाविस्कर यांचा सुपुत्र असून त्याने आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निमगव्हान येथे पूर्ण केले. त्यानंतर इयत्ता 11 वी व 12 वीचे शिक्षण कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात घेतले. लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या ऋषिराजने सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर मेहनत आणि जिद्दीच्या बळावर NEET-2026 परीक्षेत हे यश संपादन केले.
ऋषिराजच्या या यशामुळे त्याचे आई-वडील, शिक्षक, नातेवाईक तसेच निमगव्हान गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध स्तरांतून त्याचे अभिनंदन करण्यात येत असून, त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, ऋषिराजला BAMS अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळावा आणि भविष्यात एक यशस्वी व सेवाभावी डॉक्टर म्हणून समाजसेवा करण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहेत.

No comments