ख्रिस्ती धर्माच्या बदनामीचे षड्यंत्र थांबवावे ख्रिस्ती मिशन चर्च बचाव समितीची अपर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांचेकडे मागणी शौकतभाई शेख / श्री...
ख्रिस्ती धर्माच्या बदनामीचे षड्यंत्र थांबवावे
ख्रिस्ती मिशन चर्च बचाव समितीची अपर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांचेकडे मागणी
शौकतभाई शेख / श्रीरामपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर एकूणच देशामध्ये ख्रिस्ती धर्म आणि ख्रिस्ती समाजावर अन्याय, अत्याचाराच्या व बदनामीच्या घटना वाढत आहेत. सदर घटनांना आळा बसावा, त्या पुर्णतः था़बविल्या जाव्यात याबाबत अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना ख्रिस्ती मिशन चर्च बचाव समितीच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,समाज माध्यमातून समजलेल्या माहितीनुसार श्रीरामपूर येथे घडलेल्या कथित धर्मा़ंतर प्रकरणातील दोन आरोपींनी एका पीडित मुलीला बळजबरीने चर्च मधले पाणी पाजून, तिला ख्रिस्ती धर्माचे पालन करण्याकरिता, बायबलच्या पाया पडायला सांगितले व तिचा विनयभंग केला. असे वृत्त कोणतीही शहानिशा न करता प्रसृत करण्यात आले. वस्तुतः उपरोक्त उल्लेखित दोनही आरोपी हे ख्रिश्चन धर्मीय नाहीत. याउपरांत वृत्त कथनात दाखविलेला प्रकार हा ख्रिस्ती धर्म किंवा धार्मिक विधीनुसार अशा प्रकारचे कोणतेही कृत्य केले जात नाही हे महत्त्वाचे आहे.
ख्रिस्ती धर्माच्या नावाखाली असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींची निखालस चौकशी होऊन योग्य ती कारवाई करावी. आणी अशा प्रकारे ख्रिस्ती धर्माला बदनाम करण्याचे षड़यंत्र थांबवले जावे असेही निवेदनात म्हटले आहे. तरीही वरील घटनेची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर कार्यवाही व्हावी. तसेच आरोप सिद्ध न झाल्यास आरोप करणारी व्यक्ती वा व्यक्तीसमुह यांना कायद्याने बाधित करण्यात यावे आणि ख्रिस्ती समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी यावेळी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांचेकडे करण्यात आली आहे. यावेळी पा.पीटर बनकर, रेव्ह.राजेश कर्डक, पा. शैलेश अमोलिक, रेव्ह. ए.एस.अमोलिक, पत्रकार दीपक कदम,विजय बरसे, बाबासाहेब जाधव, विल्सन बोर्डे, प्रवीण शिंदे,सुरेश ठुबे,सुभाष खरात, सागर जोगदंड, विजय त्रिभुवन,रवींद्र लोंढे,फ्रान्सिस साळवे, कार्तिक चांदेकर,सुनील तोरणे, एस.पी.पंडित, प्रकाश निकाले,अजय गायकवाड,सुधीर बारस्कर,बबन जाधव समीर आल्हाट अशोक त्रिभुवन बी.आर.भालेराव, संजय साळवे आदींसह मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.
वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दीपक कदम श्रीरामपूर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments