adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिरपूर तालुक्यात ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना (NGP 5768) ची स्थापना दादाभाई महिरे अध्यक्षपदी; तालुका कार्यकारिणीची एकमताने बिनविरोध निवड

शिरपूर तालुक्यात ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना (NGP 5768) ची स्थापना दादाभाई महिरे अध्यक्षपदी; तालुका कार्यकारिणीची एकमताने बिनव...

शिरपूर तालुक्यात ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना (NGP 5768) ची स्थापना

दादाभाई महिरे अध्यक्षपदी; तालुका कार्यकारिणीची एकमताने बिनविरोध निवड



शिरपूर प्रतिनिधी

(संपादक : हेमकांत गायकवाड)

दिनांक २६ जुलै २०२६ रोजी शिरपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत माजी तालुका अध्यक्ष तथा मार्गदर्शक तुषार मोहन पाटील व उज्वला नवनीत मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना (NGP 5768) ची स्थापना करण्यात आली.

बैठकीत शिरपूर तालुका कार्यकारिणीची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानुसार दादाभाई शिवाजी महिरे यांची अध्यक्ष, विजय उत्तम पावरा यांची उपाध्यक्ष, भरत दिलीपगीर गोसावी (बाळासाहेब) यांची सचिव, श्वेता तुकाराम गुजर यांची महिला अध्यक्ष, सिंधू काळू बागुल यांची महिला उपाध्यक्ष, भटेसिंग दरबारसिंग चौधरी यांची सहसचिव, ज्ञानेश्वर राजधर पाटील यांची कार्याध्यक्ष, तुषार मोहन पाटील यांची मार्गदर्शक, तर जगदीश भुरा राठोड यांची कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

सल्लागार म्हणून जहांगीर मगन पावरा, रत्नमाला रामजी पावरा, संगिता यशवंत ईशी, भावनेश अशोक पाटील, जितेंद्र आनंदसिंग राजपूत व विकास सुरसिंग पावरा यांची निवड करण्यात आली. ज्ञानेश्वर लालचंद पावरा यांची प्रमुख संघटक म्हणून निवड करण्यात आली.

कार्यकारिणी सदस्य म्हणून सतीष प्रभाकर पाटील, महेंद्र मगन ढिवरे, दिलीप न्हानला पावरा, भरत वसंत देशमुख, बालू गैंधल पाटील, दिनेश रघुनाथ पाटील आणि मनोज साहेबराव राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित कार्यकारिणीने शिरपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालक बंधू-भगिनींनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. कर्मचारी हिताच्या प्रश्नांसाठी संघटितपणे लढा देत न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. उपस्थितांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments