घाडवेल येथील SIR कॅम्पला गटशिक्षणाधिकारी मा. अजित पाटील यांची सदिच्छा भेट; मतदार नोंदणी प्रक्रियेचा घेतला आढावा चोपडा : अशोक कोळी (संपादक ...
घाडवेल येथील SIR कॅम्पला गटशिक्षणाधिकारी मा. अजित पाटील यांची सदिच्छा भेट; मतदार नोंदणी प्रक्रियेचा घेतला आढावा
चोपडा : अशोक कोळी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील मोजे घाडवेल येथे सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) कॅम्पला आज मा. अजित पाटील (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती चोपडा) यांनी सदिच्छा भेट देत मतदार नोंदणी व पडताळणी प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून मतदार नोंदणीची कामे अचूक, पारदर्शक व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी व पडताळणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन लोकशाही बळकट करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
घाडवेल येथील SIR कॅम्पमध्ये आतापर्यंत ऑफलाइन ९८० तर ऑनलाइन ८०४ अर्ज प्राप्त झाले असून, गावातील एकूण १,३८२ मतदारांची नोंद आहे. मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कॅम्पदरम्यान उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करून नोंदणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. यामध्ये बीएलओ भगवान पाटील, रमेश पाटील, अशोक कोळी, पाटील मॅडम, शिपाई ज्ञानेश्वर पाटील व लक्ष्मण पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
मतदार नोंदणी व पडताळणी प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात आले.


No comments