adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मलकापूर तालुक्यात धर्मवीर युथ फाउंडेशनचा झंझावात; पाच गावांत नव्या शाखांची स्थापना

 मलकापूर तालुक्यात धर्मवीर युथ फाउंडेशनचा झंझावात; पाच गावांत नव्या शाखांची स्थापना  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलका...

 मलकापूर तालुक्यात धर्मवीर युथ फाउंडेशनचा झंझावात; पाच गावांत नव्या शाखांची स्थापना 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर:- तालुक्यात धर्मवीर युथ फाउंडेशनच्या संघटनात्मक विस्ताराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, लोणवाडी, जांभूळधाबा, आळंद, खामखेड आणि देवधाबा या गावांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात नव्या शाखांची स्थापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, भगवे ध्वज आणि युवकांच्या मोठ्या उपस्थितीत प्रत्येक शाखा उद्घाटन सोहळा प्रेरणादायी वातावरणात पार पडला.बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली आणि धर्मवीर युथ फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली फाउंडेशनचा विस्तार वेगाने होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि जनहिताच्या कार्यासाठी युवकांना एकत्र आणण्याचे कार्य फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असून, प्रत्येक गावात सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.युवकांचा वाढता विश्वास, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि गावागावातून मिळणारे सहकार्य यामुळे धर्मवीर युथ फाउंडेशनची ताकद दिवसेंदिवस वाढत असून, मलकापूर तालुक्यात नव्या सामाजिक ऊर्जेचा संचार होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला प्रत्येक गावातील शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखा संघटक, सचिव, सोशल मीडिया प्रमुख, धर्मवीर युथ फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच असंख्य युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना "देव – देश – धर्म आणि जनतेच्या सेवेसाठी हातात हात घालून एकत्र येऊया" असा संदेश देण्यात आला.

No comments