अलहसनात उर्दू प्राथमिक शाळेची शिष्यवृत्तीत दमदार भरारी! UPS इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; रावेरच्या उर्दू...
अलहसनात उर्दू प्राथमिक शाळेची शिष्यवृत्तीत दमदार भरारी!
UPS इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; रावेरच्या उर्दू शिक्षणाचा उंचावला मान
रावेर मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (UPS) इयत्ता ७ वी – २०२६ च्या अंतरिम (तात्पुरत्या) निकालात अलहसनात उर्दू प्राथमिक शाळा, रावेर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
या परीक्षेत सैय्यद उज़ेर सैय्यद युसुफ अली यांनी ६९.३३ गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. शेख अवेस शेख अलीम यांनी ६८.६६ गुणांसह द्वितीय, तर हुमेरा फारुक खाटीक हिने ६३.३३ गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. या तिन्ही विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटला असून रावेर परिसरातील उर्दू शिक्षणाचा मानही उंचावला आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास, पालकांचे प्रोत्साहन तसेच वर्गशिक्षक शेख इमरान कमरुद्दीन यांच्यासह सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी केलेल्या कठोर परिश्रमाचे हे यश असून त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या यशाबद्दल मुख्याध्यापक कुरबान शरीफोद्दीन, शिक्षकवृंद, संस्थाचालक, पालक आणि शिक्षणप्रेमींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शाळेच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही अशीच उज्ज्वल शैक्षणिक परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

No comments