धर्मवीर युथ फाउंडेशनच्या तालुका प्रमुखपदी देवा बाबस्कार यांची नियुक्ती अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर : धर्मवी...
धर्मवीर युथ फाउंडेशनच्या तालुका प्रमुखपदी देवा बाबस्कार यांची नियुक्ती
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : धर्मवीर युथ फाउंडेशन, महाराष्ट्र राज्याच्या वतीने लोणवाडी (ता. मलकापूर, जि. बुलढाणा) येथील श्री.देवा बावस्कार यांची मलकापूर तालुका प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांनी जाहीर केली नियुक्ती वेळी जिल्हा अध्यक्ष ओम टप उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन धर्म, राष्ट्र आणि हिंदू संस्कृतीच्या संरक्षणासाठी तसेच सामाजिक जनजागृती, संघटन बळकटीकरण आणि युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, धर्मनिष्ठा व स्वाभिमान जागविण्याचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.या नियुक्तीबद्दल श्री. देवा बाबस्कर यांचे विविध सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांनी संघटनेच्या माध्यमातून समाजहितासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

No comments