adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दीड महिन्यानंतरही कार्यवाही नाही; लोणवडी ग्रामपंचायतीतील कथित अनियमिततेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष? प्रहार संघटनेची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव

 दीड महिन्यानंतरही कार्यवाही नाही; लोणवडी ग्रामपंचायतीतील कथित अनियमिततेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष? प्रहार संघटनेची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां...

 दीड महिन्यानंतरही कार्यवाही नाही; लोणवडी ग्रामपंचायतीतील कथित अनियमिततेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष? प्रहार संघटनेची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव 


पल्लवी पाटील खामगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लोणवडी ग्रामपंचायतीतील नाली बांधकाम व रस्ते कामांमध्ये कथित अनियमितता झाल्याच्या तक्रारीवर पंचायत समिती मलकापूरचे गटविकास अधिकारी यांनी दीड महिना उलटूनही कोणतीही चौकशी अथवा कार्यवाही न केल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा तालुका प्रमुख अमोल बावस्कार यांनी जिल्हा परिषद बुलढाणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करून स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, ग्रामपंचायत लोणवडीच्या दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजीच्या ठराव क्रमांक 6(2) अंतर्गत नाली बांधकामास मंजुरी देण्यात आली होती. मात्र मंजुरी मिळूनही आजपर्यंत संबंधित नालीचे काम सुरू करण्यात आलेले नाही. याउलट ठराव मंजूर होण्यापूर्वीच, म्हणजे 11 डिसेंबर 2025 रोजी वॉर्ड क्रमांक 3 मधील गजानन भारंबे ते गावठाण या रस्त्याचे काम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सदर रस्त्याच्या कामासाठी आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक मंजुरी घेण्यात आली होती का, याची सखोल चौकशी करून नियमबाह्य कामे करणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यापूर्वीही दिनांक 15 जून 2026 रोजी याच प्रकरणाबाबत पंचायत समिती मलकापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र दीड महिना उलटूनही कोणतीही चौकशी किंवा कार्यवाही करण्यात आली नसल्याने संबंधित प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.

त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर स्वतंत्र, निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी तक्रारीवर कार्यवाही का केली नाही, याची विभागीय चौकशी करून त्याचा अहवाल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

निवेदनासोबत गटविकास अधिकाऱ्यांना यापूर्वी देण्यात आलेल्या निवेदनाची प्रत तसेच ग्रामपंचायत लोणवडीच्या संबंधित ठरावाची प्रतही जोडण्यात आली असून, दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

No comments