चोपड्यात संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा; ५ ते ११ ऑगस्टदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन चंद्रकांत पाटील विचखेडा (संपा...
चोपड्यात संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा; ५ ते ११ ऑगस्टदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंच मंडळ, मोठा माळी वाडा, चोपडा यांच्या वतीने श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ५ ते १२ ऑगस्ट २०२६ दरम्यान विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात स्थापना, पूजा-अर्चना, आरती, अखंड हरिनाम कीर्तन, महाप्रसाद तसेच पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता स्थापना, पूजा व आरतीनंतर अखंड हरिनाम कीर्तन सोहळ्यास सुरुवात होणार आहे. यावेळी समाज बांधव व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सोहळ्यादरम्यान दररोज नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे. ५ ऑगस्ट रोजी ह.भ.प. सुनील महाराज, बेटावद (जामनेर), ६ ऑगस्ट रोजी ह.भ.प. शुभम महाराज, मंदाणे (शहादा), ७ ऑगस्ट रोजी ह.भ.प. उमेश महाराज, दहिवद, ८ ऑगस्ट रोजी ह.भ.प. श्रीकांत महाराज, खडके, ९ ऑगस्ट रोजी ह.भ.प. गजानन महाराज सोनटक्के, पारोळा, १० ऑगस्ट रोजी ह.भ.प. भानुदास महाराज, भुसावळ तसेच ११ ऑगस्ट रोजी ह.भ.प. भावेश महाराज, विटनेर यांचे कीर्तन होणार आहे. प्रत्येक दिवशी विविध समाज बांधवांकडून कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात विणेकरी, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, चौपदार, साऊंड सिस्टिम तसेच अन्य सेवेकऱ्यांची सेवा राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत सामुदायिक कार्यक्रम, सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत महाप्रसाद, तर दुपारी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
कीर्तनाचे ठिकाण गो. भि. जिर्णिंग, चोपडा (बाबाजी जिर्णिंग) येथे राहणार आहे. तसेच ११ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत माळी समाज मंदिरात काल्याचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित या धार्मिक कार्यक्रमांचा चोपडा शहर व परिसरातील सर्व समाज बांधव, महिला-भगिनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंच मंडळ व सर्व समाज बांधव, मोठा माळी वाडा, चोपडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments