adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथील परीस वाघुळदेची इस्रोमध्ये निवड तर सोहम व साक्षी मारतळे यांचे नीट मध्ये यश

 फैजपूर येथील परीस वाघुळदेची इस्रोमध्ये निवड तर सोहम व साक्षी मारतळे यांचे नीट मध्ये यश   इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फ...

 फैजपूर येथील परीस वाघुळदेची इस्रोमध्ये निवड तर सोहम व साक्षी मारतळे यांचे नीट मध्ये यश 


 इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपुर- येथील आराधना कॉलनी मधील रहिवासी वंदना वाघुळदे यांचा सुपुत्र परिस वाघुळदे याची बेंगलोर येथील इस्रो मध्ये असिस्टंट सायंटिस्ट म्हणून निवड झाली. तसेच डी एन कॉलेज मधील प्रा. गोविंद मारतळे यांचे सुपुत्र व सुपुत्री चि. सोहम मारतळे याने नेट परीक्षेत  ६५९ गुण प्राप्त करून तर साक्षी मारतळे हिने ५०० गुण प्राप्त करून नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. आपल्या कॉलनीतील विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व कॉलनीतील रहिवाशांनी त्यांचा कौतुक समारंभ आयोजित केला व या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी फैजपूरच्या नगराध्यक्षा सौ. दामिनी सराफ, न्हावीच्या भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन प्रा. डॉ.के.जी पाटील, मुख्याध्यापिका सौ. संगीता फिरके, माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी व माजी नगराध्यक्षा तसेच विद्यमान नगरसेविका सौ‌.अमिता चौधरी, नगरसेवक सिद्धेश्वर वाघुळदे, पवन सराफ, सुरज गाजरे, संदीप भारंबे, डी एन कॉलेजचे प्रा.श्री. राजपूत , व समस्त आराधना कॉलनी व सिद्धिविनायक नगर मधील रहिवासी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक करीत गुणगौरव सोहळा संपन्न केला. आपल्या या यशात आपल्या आई-सोबतच वेळोवेळी मदत करणाऱ्या  व्यक्तींचा ही सिंहाचा वाटा आहे असे परिस वाघुळदे याने आपल्या मनोगतात व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी असेच परिश्रम करून यापुढेही आपल्या आई-वडिलांचे गावाचे व देशाचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष दामिनी सराफ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व आराधना कॉलनी व सिद्धिविनायक नगर मधील रहिवासी तसेच परिस ची  मित्रमंडळी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गुरवसर यांनी केले तर सौ. पुनम नेहेते यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments