adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वर्षावासानिमित्त पंचशील नगरात प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात बुद्ध धम्माच्या विचारांनी परिसर दुमदुमला; सुशीलाबाई भालेराव यांच्या स्मरणार्थ खीरदान

वर्षावासानिमित्त पंचशील नगरात प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात बुद्ध धम्माच्या विचारांनी परिसर दुमदुमला; सुशीलाबाई भालेराव यांच्या स्मरणार्थ...

वर्षावासानिमित्त पंचशील नगरात प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात

बुद्ध धम्माच्या विचारांनी परिसर दुमदुमला; सुशीलाबाई भालेराव यांच्या स्मरणार्थ खीरदान 

चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : वर्षावासानिमित्त पंचशील नगर, चोपडा येथे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भालेराव परिवाराच्या वतीने तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कालकथित सुशीलाबाई मगन भालेराव यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.

यावेळी बोधाचार्य सिद्धार्थ बाविस्कर यांनी वर्षावासाचे महत्त्व विशद केले. उपस्थित समाजबांधवांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून बुद्ध धम्म विधी पूर्ण केला. त्यानंतर बोधाचार्य सिद्धार्थ बाविस्कर यांनी धम्मदेसना देत भगवान बुद्धांच्या विचारांचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. बोधाचार्य वसंत शिंदे यांनीही यावेळी धम्मदेसना दिली.

कार्यक्रमात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर कु. लुम्बिनी प्रविण करनकाळे या भीमकन्येने प्रभावी प्रबोधन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी केलेले कार्य, त्यांचे विचार आणि सामाजिक समतेचा संदेश यावर तिने उपस्थितांना मार्गदर्शन केले. 


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रविण करनकाळे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच समारोपप्रसंगी आभार प्रदर्शनही करण्यात आले.

दरम्यान, कालकथित सुशीलाबाई मगन भालेराव यांच्या स्मरणार्थ भालेराव परिवाराच्या वतीने उपस्थित समाजबांधवांसाठी खीरदान करण्यात आले. या पवित्र कार्यक्रमास पंचशील नगर तसेच भीम नगर परिसरातील समाजबांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी आवश्यक डेकोरेशनची व्यवस्था लुम्बिनी टेन्ट हाऊस यांच्या वतीने करण्यात आली.

कार्यक्रमाच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता व मानवतेच्या विचारांचा संदेश समाजबांधवांपर्यंत पोहोचविण्यात आला.

नमो बुद्धाय! जय भीम!

No comments