adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोर्टाच्या आदेशानंतरही कब्रस्तानावर गार्डन? जनसमाधान बैठकीत अशफाक काझी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार

  कोर्टाच्या आदेशानंतरही कब्रस्तानावर गार्डन? जनसमाधान बैठकीत अशफाक काझी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार  अरुण धनगर वरणगाव (संपादक -:- ...

 कोर्टाच्या आदेशानंतरही कब्रस्तानावर गार्डन? जनसमाधान बैठकीत अशफाक काझी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार 


अरुण धनगर वरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

भुसावळ प्रांत कार्यालयात जनसमाधान बैठकीत अशफाक काझी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रार दाखल केल्यानंतर चर्चा करतांना .भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयात गुरुवार ( ता.६ ) जिल्हाधिकारी जळगाव यांच्या उपस्थितीत आयोजित 'जनसमाधान' बैठकीत वरणगाव येथील गट क्रमांक ५९१ मधील कथित कब्रस्तानाच्या जागेवर नगर परिषदे कडून गार्डन विकसित करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत अशफाक खलीकुज्जमा काझी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल केली. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सादर केलेल्या निवेदना नुसार, गट क्रमांक  ५९१ही जागा पूर्वापार काझी मुस्लिम समाजाच्या कब्रस्ताना साठी वापरात असून, त्या ठिकाणी आजही समाजातील अनेक पुर्वजांच्या कबरी अस्तित्वात आहेत. या जागे बाबत भुसावळ, जळगाव तसेच औरंगाबाद येथील न्यायालयानेही संबंधित जागा कब्रस्तानाची असल्याचे आदेश दिल्याचा दावा अर्जदाराने केला आहे. न्यायालयाच्या आदेशा नुसार या जागेवर कोणतेही बांधकाम, खोदकाम अथवा रस्ता तयार करू नये, अशी स्पष्ट भूमिका न्यायालयाने घेतल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, न्यायालयीन आदेशांकडे दुर्लक्ष करून वरणगाव नगरपरिषदेकडून कथितरित्या कबरी तोडून त्या जागेवर  गार्डन विकसित करण्यात आले आहे. असा गंभीर आरोप अर्जात करण्यात आला आहे. या कृतीमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे अर्जदाराने म्हटले आहे. 

सहा वर्षांपासून सुरू आहे पाठपुरावा अर्जा सोबत जोडलेल्या कागद पत्रां नुसार, या प्रकरणाचा पाठपुरावा तब्बल २०२० पासून सातत्याने सुरू आहे. नगरपरिषदेने ९ जानेवारी २०२० रोजी ई-निविदा प्रसिद्ध केल्या नंतर अर्जदाराने १० जानेवारी २०२० रोजी मुख्याधिकाऱ्यांकडे हरकत नोंदविली होती. त्या नंतर मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध स्तरांवर अर्ज, नोटिसा, स्मरणपत्रे आणि अपील करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदना नुसार, ३ फेब्रुवारी २०२०  जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणाचा सात दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याचा उल्लेख आहे. तसेच २०२५ मध्ये तहसीलदारांकडे लोकशाही दिनात तक्रार करण्यात आली होती. तहसीलदार यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचा दावाही अर्जदाराने केला आहे. शिवाय ३ जून २०२५ ला जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील अर्ज आणि १ जानेवारी २०२६ रोजी स्मरणपत्रही देण्यात आले. मात्र, वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे. जनसमाधान बैठकीत पुन्हा न्यायाची मागणी गुरुवारी ( ता.६ ) झालेल्या जनसमाधान बैठकीत अशफाक काझी यांनी पुन्हा एकदा सर्व कागदपत्रांसह सविस्तर निवेदन सादर करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. न्यायालयीन आदेशांचे पालन करून कथित कब्रस्तानाच्या जागेचे संरक्षण करावे, संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या प्रकरणामुळे वरणगाव परिसरात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले असून, आता जिल्हा प्रशासन या तक्रारीची कोणती दखल घेते आणि पुढील काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments