लळिंग शिवारात काळजाचा थरकाप : ट्रक-दुचाकी अपघातात खान्देशी अभिनेत्री स्वाती आहेर गंभीर जखमी.. नरेंद्र रायसिंग धुळे (संपादक -:- हेमकांत ग...
लळिंग शिवारात काळजाचा थरकाप : ट्रक-दुचाकी अपघातात खान्देशी अभिनेत्री स्वाती आहेर गंभीर जखमी..
नरेंद्र रायसिंग धुळे
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धुळे - शहराच्या जवळ असलेला लळींग किल्ल्यावरून शूटिंग आटोपून घराकडे परतणाऱ्या एका तरुणीच्या दुचाकीला ट्रकने कट मारल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. स्वाती आहेर (रा. साक्री रोड, धुळे) असे या जखमी तरुणीचे नाव असून, तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताचा घटनाक्रम : मिळालेल्या माहितीनुसार, साक्री रोड येथे राहणारी स्वाती आहेर ही तरुणी लळीग किल्ल्यावर शूटिंगसाठी गेली होती. तिला अहिराणी गाण्यात अभिनेत्री म्हणून भूमिका साकारण्याची नुकतीच संधी मिळाली होती व शूटिंगचे काम संपवून ती तिच्या ॲक्टिव्हा दुचाकीने (क्र. MH 18 CH 7113) घराकडे परतत होती. त्याचवेळी लळीग परिसरात एका ट्रकने तिच्या दुचाकीला जोरदार कट मारला. आणि या अपघातात स्वाती आहेर ही तिच्या ॲक्टिव्हा दुचाकी वरून खाली कोसळली आणि तिच्या डोक्याला जबर मार लागला आहे.
रुग्णालयात दाखल आणि अभिनेत्री स्वाती आहेर हिची प्रकृती : अपघातानंतर तिला तात्काळ रुग्णवाहिकेच्या साहाय्याने हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (सिव्हिल हॉस्पिटल धुळे) येथे दाखल करण्यात आले आहे. व डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ती पूर्णपणे बेशुद्धवस्थेत होती. डॉक्टरांच्या तपासणीत तिच्या डोक्यात रक्तस्राव झाल्याचे निष्पन्न झाले असून, तिला तातडीच्या शस्त्रक्रियेची (ऑपरेशन) आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच हिरे रुग्णालयात तिला अतिदक्षता विभागात (ICU) ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते.
केतन भामरे यांची तत्पर मदत : या आणीबाणीच्या परिस्थितीत, हिरे वैद्यकीय महाविद्यालयात २४ तास रुग्णांच्या मदतीसाठी तत्पर असणारे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे (धुळे जिल्हा) महानगरप्रमुख केतन भामरे यांनी मोठी मदत केली. तरुणीचा जीव वाचवण्यासाठी आणि तिच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचण्यासाठी भामरे यांनी पोलिसांची मदत घेतली. तसेच सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप मेसेजच्या माध्यमातून त्यांनी तत्परतेने सूत्रे हलवून नातेवाईकांशी संपर्क साधला आणि त्यांना रुग्णालयात बोलावून घेतले व पुढील उपचारांसाठी छत्रपती हॉस्पिटलमध्ये हलवले
रुग्णाची गंभीर अवस्था आणि शस्त्रक्रियेची गरज ओळखून, केतन भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नातेवाईकांच्या संमतीने स्वातीला सायंकाळी अधिक उपचारांसाठी धुळ्यातील छत्रपती हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. सध्या तिच्यावर छत्रपती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, डॉक्टरांचे पथक तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. केतन भामरे यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे तरुणीला वेळेवर मदत मिळू शकली, ज्याबद्दल नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments