मलकापूर शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात; बांधकाम अभियंता धिरज ठोंबरे यांचा प्रहार जनशक्ती संघटनेकडून सत्कार अमोल बावस्कार बुलढ...
मलकापूर शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात; बांधकाम अभियंता धिरज ठोंबरे यांचा प्रहार जनशक्ती संघटनेकडून सत्कार
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर - शहरातील अनेक रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याबाबत न.प. प्रशासनाच्या वतीने कार्यवाही सुरू करण्यात आल्याने बांधकाम अभियंता धिरज ठोंबरे यांचा आज प्रहार जनशक्ती संघटना जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी शाल, टोपी, श्रीफळ देवून त्यांचा यथोचित सत्कार केला.
मलकापूर शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यातच मागील महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे ह्या खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने वाहनधारक, पायी चालणारे, आबालवृध्द, महिला, विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत होते. नागरिकांना होणार्या त्रासाबाबत प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने न.प. प्रशासनाला अवगत करण्यात आल्यानंतर न.प. च्या वतीने तातडीने शहरातील भारतकला रोड, आठवडी बाजार रोड, स्टेशन रोड, चांडक शाळा रोड यासह आदी रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याकरीता चुरी, मुरूम टाकून ते खड्डे बुजविण्याला प्रारंभ करण्यात आला. न.प. च्या वतीने रस्त्यांवरील पडलेले खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आल्याने न.प. बांधकाम अभियंता धिरज ठोंबरे यांचा प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हा उपप्रमुख अजय टप, बलराम बावस्कार यांनी शाल, टोपी, श्रीफळ देवून यथोचित सत्कार केला. यावेळी न.प. उपाध्यक्ष अनिल गांधी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

No comments