सावदा पोलिसांची धाडसी कारवाई: प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू , पानमसाला व गुटख्यासह साडेदहा लाखांच्या मुद्देमाल जप्त मुबारक तडवी रावेर (संप...
सावदा पोलिसांची धाडसी कारवाई: प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू , पानमसाला व गुटख्यासह साडेदहा लाखांच्या मुद्देमाल जप्त
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांना मिळालेल्या गोपनीय खबरीनुसार दिनांक २७/०८/२०२६ रोजी रात्री अवैध प्रतिबंधीत गुटखा तस्करी होणार असल्याचे समजले सपोनि फड यांनी तातडीने रात्री सावदा पोलीस स्टेशनचे आपल्या सहकारी कर्मचारी यांना सुचित करून सापळा लावला गाते स्टेशन गावाबाहेर तांदलवाडी फाटा या ठिकाणी रात्री ११ वाजेच्या सुमारास सावदा पोलिसांना एका राखाडी (ग्रे) रंगाच्या होंडा अमेझ कार समोरुन आली व या होंडा अमेझ कार (क्र. MH-19-CV-4445) ची तपासणी केली असता सदर कारमध्ये प्रतिबंधित गुटखा आढळून आला
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू, विमल पानमसाला आणि गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला सावदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण १०,२७,७००/- रुपये (दहा लाख सत्तावीस हजार सातशे रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कारचालक सारंग मुरलीधर अवचार (वय ३१, रा. अकलूद, ता. यावल, जि. जळगाव) याच्याकडे विचारपूस,चौकशी केली असता, त्याने कारमध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याचे कबूल केले. पोलिसांनी दोन खाजगी पंचांसमक्ष कारची झडती घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणात विमल पानमसाला, केशरयुक्त पानमसाला आणि तंबाखूचे पाकीट आढळून आले.
जप्त केलेला मुद्देमाल:
१) विमल पानमसाला आणि तंबाखूचे वेगवेगळे पाकीट (एकूण किंमत: ५,२७,७००/- रुपये)
२) गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरलेली होंडा अमेझ कार (किंमत: ५,००,०००/- रुपये)
एकूण जप्त मुद्देमाल: १०,२७,७००/- रुपये
आरोपीची कबुली व गुन्हा दाखल:
आरोपीने हा प्रतिबंधित माल मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील एका व्यापाऱ्याकडून भुसावळ आणि वरणगाव परिसरात किरकोळ विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनमध्ये FIR No. 0222/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १२३, २७४, २७५, १०६, २२३ आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ चे कलम २६(२)(i), २६(२)(iv), ३०(२)(a), ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, पोहेका/ निलेश बाविस्कर,पो कॉ संजय। तडवी यांनी केली असून पुढील तपास पो. उ. नि. राहुल सानप हे करत आहेत.

No comments