यावल येथील मंडळ जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल येथील म...
यावल येथील मंडळ जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल येथील मंडळ जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल येथे स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमाला व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन स्कूलचे संचालक माननीय श्री ए.बी.महाजन सासहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संगीत तालबद्ध कवायत केली.व लेझीम सादर केले. त्याप्रमाणे शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन तसेच इंग्रजी माध्यमच्या प्राचार्या श्रीमती दीपाली धांडे , आय. टी. आय. चे प्राचार्य जी. जी. वाहूळदे ,प्रवीण झोपे सर व ITI चे शिक्षक उपस्थित होते. त्यानंतर भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे, देशभक्तीपर गीत गायन, देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकून घेतली. तसेच शाळेचे सर्व वातावरण देशभक्तीमय झाले.
शाळेतील सहशिक्षक रुचिता पाटील व संस्कृति फेगडे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष ए. बी .महाजन यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना देशभक्ती, प्रेम व आदर्श याबद्दल माहिती सांगितली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सरोज येवले यांनी अतिशय सुंदर प्रकारे केले. या कार्यक्रमासाठी संपूर्ण रूपरेषा पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे व गौरी भिरूड यांनी मांडली केली. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन शिक्षक प्रशांत तळेले यांनी केले. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला व अशा प्रकारे स्वातंत्र्य दिन आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला.

No comments