adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महसूल विभागाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्नेहल संजय फिरके यांचा सन्मान

  महसूल विभागाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्नेहल संजय फिरके यांचा सन्मान  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : महसूल विभागाच्या ...

 महसूल विभागाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्नेहल संजय फिरके यांचा सन्मान 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : महसूल विभागाच्या सन २०२५–२६ मधील विविध शासकीय कामकाजात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल स्नेहल संजय फिरके यांचा “उत्कृष्ट ऑपरेटर” म्हणून सन्मान करण्यात आला.

मा. आमदार श्री. अमोल दादा जावळे तसेच तहसीलदार मोहनमाला नाझिरकर मॅडम यांच्या शुभहस्ते स्नेहल संजय फिरके यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल घेत मिळालेला हा सन्मान त्यांच्या प्रामाणिकपणा, कार्यतत्परता, अचूकता आणि जबाबदारीने केलेल्या कामाची पावती मानली जात आहे.

महसूल विभागातील दैनंदिन कार्यालयीन कामकाजासोबतच जनगणना, ॲग्रीस्टॅक, SIR (विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण), विविध शासकीय दाखले तयार करणे, माहितीचे संगणकीकरण, ऑनलाइन प्रणालीवरील कामकाज तसेच इतर महत्त्वाच्या कार्यालयीन जबाबदाऱ्या त्यांनी वेळेत आणि अचूकपणे पार पाडल्या.

या उल्लेखनीय कार्यासाठी तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, बी. एम. पवार, संजय गांधी साहेब, एम. एम. खारे साहेब, बी. एस. चौधरी मॅडम तसेच सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि महसूल विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने विविध जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडता आल्याचे स्नेहल संजय फिरके यांनी सांगितले.

जनगणना, ॲग्रीस्टॅक, SIR यांसारख्या महत्त्वाच्या शासकीय उपक्रमांमध्ये तसेच विविध प्रकारचे शासकीय दाखले तयार करणे, ऑनलाइन नोंदी, माहितीचे संगणकीकरण आणि इतर कार्यालयीन कामकाज यामध्ये त्यांनी सातत्याने योगदान दिले. कामातील अचूकता, तत्परता आणि वेळेचे नियोजन यामुळे त्यांनी आपल्या कार्याची वेगळी छाप निर्माण केली आहे.

“हा सन्मान माझ्या एकट्याच्या कार्याचा नसून, मला वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य करणाऱ्या सर्व वरिष्ठ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व सहकाऱ्यांच्या सामूहिक सहकार्याचा गौरव आहे,” अशी भावना स्नेहल संजय फिरके यांनी व्यक्त केली.

या सन्मानाबद्दल त्यांनी मा. आमदार अमोल दादा जावळे, तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, बी. एम. पवार, संजय गांधी साहेब, एम. एम. खारे साहेब, बी. एस. चौधरी मॅडम तसेच सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि महसूल विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केलेल्या कामाची मिळालेली ही पावती यापुढे अधिक जबाबदारीने व उत्कृष्टपणे कार्य करण्याची प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास स्नेहल संजय फिरके यांनी व्यक्त केला.

No comments