adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंतुर्ली पीक संरक्षण सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

 अंतुर्ली पीक संरक्षण सोसायटीची  वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात  अंतुर्ली ता. मुक्ताईनगर किरण धायले : संपादक हेमकांत गायकवाड  अंतुर्ली ये...

 अंतुर्ली पीक संरक्षण सोसायटीची  वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात 


अंतुर्ली ता. मुक्ताईनगर किरण धायले :

संपादक हेमकांत गायकवाड 


अंतुर्ली येथील पीक संरक्षण सहकारी सोसायटीची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन चुन्नीलाल फकीरा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

सभेच्या प्रारंभी संस्थेचे सचिव मुरलीधर महाजन यांनी मागील सभेचे इतिवृत्त (प्रोसिडिंग) वाचून दाखविले. त्यानंतर सभेच्या अजेंड्यावरील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेचा ऑडिट मेमो तसेच मागील वर्षाचा जमा-खर्चाचा अहवाल सभेसमोर वाचून दाखविण्यात आला.

तसेच आगामी वर्षाचे अंदाजपत्रक सभेसमोर सादर करण्यात आले. त्यावर उपस्थित सभासदांनी चर्चा करून अंदाजपत्रकास सर्वानुमते मंजुरी दिली.

यावेळी ज्येष्ठ शेतकरी एस. ए. भोईसर यांनी उपस्थित शेतकरी सभासदांना मार्गदर्शन केले. संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबतही यावेळी विचारविनिमय करण्यात आला.

सभेच्या अध्यक्षीय समारोपानंतर चेअरमन चुन्नीलाल फकीरा सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ, शेतकरी सभासद बांधव-भगिनी, प्रतिष्ठित नागरिक तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात सभा संपन्न झाली.

No comments