राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त नूतन मराठा महाविद्यालयात कार्यक्रम भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव : नूतन मराठा महाविद्याल...
राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त नूतन मराठा महाविद्यालयात कार्यक्रम
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव : नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथील ग्रंथालय विभागात ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. शियाळी रामामृत रंगनाथन यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी डॉ. शियाळी रामामृत रंगनाथन यांना विनम्र अभिवादन करून ग्रंथालयाचे महत्त्व, वाचन संस्कृती आणि ग्रंथालयाच्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ग्रंथालयाची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास सहाय्यक ग्रंथपाल डॉ. हेमंत येवले तसेच ग्रंथालय कर्मचारी प्रा. कमरीन शेख, प्रा. सौरभ कचरे, प्रा. यशेश बावस्कर, प्रा. कामिनी पाटील, प्रा. साक्षी धाडे आणि कु. दिपाली झिंझने आदी उपस्थित होते.

No comments