adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा बसस्थानकात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे व जनजागृती पोस्टर

 चोपडा बसस्थानकात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे व जनजागृती पोस्टर  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)   चोपडा : शहरातील बसस्थानक प...

 चोपडा बसस्थानकात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे व जनजागृती पोस्टर 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

  चोपडा : शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चोरीच्या घटना रोखण्यासाठी तसेच प्रवाशांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवाशांच्या सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. याच अनुषंगाने चोपडा बसस्थानकाला भेट दिली असता डेपो मॅनेजर संदेश क्षीरसागर यांच्याशी प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चर्चा करून बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत विनंती करण्यात आली. त्यानुसार बसस्थानक परिसरात एकूण सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे बसस्थानक परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार असून, चोरी अथवा अन्य अनुचित प्रकार घडल्यास त्याचा तपास करण्यासाठीही सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार आहे.

तसेच बसस्थानकात प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू, मोबाईल, पर्स व पैशांची चोरी होऊ नये यासाठी प्रवाशांना सावध करणारे पाच ते सहा जनजागृती पोस्टर बसस्थानक परिसरात लावण्यात आले आहेत. या पोस्टरच्या माध्यमातून प्रवाशांना बसमध्ये चढताना-उतरताना तसेच गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना ११२ क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डेपो मॅनेजर संदेश क्षीरसागर यांच्या सहकार्याने करण्यात येत असलेल्या या उपाययोजनांमुळे चोपडा बसस्थानक परिसरातील प्रवाशांची सुरक्षितता अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

No comments