विद्यार्थी व तरुणांनी व्यसनापासून दूर राहून श्रीरामपूर नशा मुक्त करावे - पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन ४ कि.मी. रॅलीत द...
विद्यार्थी व तरुणांनी व्यसनापासून दूर राहून श्रीरामपूर नशा मुक्त करावे - पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन
४ कि.मी. रॅलीत दहा हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही रॅलीत विद्यार्थ्यांसोबत पायी चालत नशा मुक्त श्रीरामपूर साठी घोषणा दिल्या
पोलिस बॅण्ड ठरला विशेष आकर्षण ..
अहिल्यानगर येथील पोलिस बॅण्ड पथकाने रॅलीत देशभक्तीपर गीते गाऊन दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
रॅलीत ३५ शाळा व २० महाविद्यालयाचा सहभाग
शौकतभाई शेख /श्रीरामपूर :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नशामुक्ती अभियान हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर पोलिस विभागाने अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर तालुक्यात आयोजित करण्यात आलेला ‘नशामुक्ती कार्यक्रम’ हा याच अभियानाचा भाग आहे. श्रीरामपूर पोलीस विभागाने नशामुक्ती अभियानाचा अभिनव उपक्रम हाती घेतला असून श्रीरामपूर नशामुक्तीची हे अभियान एक सुरुवात आहे. या अभियानातून श्रीरामपूर शहर व तालुका नशामुक्त होईल त्यासाठी विद्यार्थी व तरुणांनी व्यसनापासून दूर राहून श्रीरामपूर व्यसनमुक्त करावे असे आवाहन अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. अहिल्यानगर पोलिस दल श्रीरामपूर शहर पोलीस विभाग यांच्या वतीने ५ दिवस नशामुक्त अभियान राबविण्यात आले. अभियानाचा समारोप आर. बी. एन. बी. कॉलेज श्रीरामपूर च्या क्रीडांगणावर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी उपस्थित असलेल्या १० हजार शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व विराट जनसमुदायाला मार्गदर्शन करताना ना. विखे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार हेमंत ओगले, मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, पोलिस अधीक्षक मूम्मका सुदर्शन, गटविकास अधिकारी
स्मिता निकाळजे, प्रांत अधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, अपर पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलिस उपअधीक्षक जयदत्त भवर, गटशिक्षणाधिकारी दीपक त्रिभुवन, पोलीस निरीक्षक विशाल खैरे, माजी सभापती वंदना मुरकुटे, प्राचार्य प्रवीण बडधे, प्राचार्य मुकुंद पोंधे, प्राचार्य सुनील साळवे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी मीनाताई जगधने यांनी युवा पिढी व्यसनमुक्त करण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. नशामुक्तीसाठी पोलिस विभागाने टाकलेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे सांगितले. आमदार हेमंत ओगले यांनीही तरुण पिढीनी सामाजिक बांधिलकी जपत व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा असे मत व्यक्त केले. अभियानाचे संयोजक अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे यांनी सर्व विद्यार्थ्यांनी अभियानाला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. नशेपासून दूर राहून स्वतःचे तसेच समाजाचे भविष्य सुरक्षित करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. नशामुक्त अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली जनजागृती ही या उपक्रमाची मोठी फलश्रुती असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुणतांबा येथील संजय भोसले यांच्या संगीत पथकाने नशा मुक्तीवर सुंदर गीते सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच आर बी एन बी कॉलेज श्रीरामपूर यांचे सांस्कृतिक विभागाने नशा बंदीवर उत्कृष्ट पथनाट्य सादर करून प्रेक्षकांचे मने जिंकली. सर्व शाळा व महाविद्यालयांनी नशा मुक्तीचे बॅनर बनविले होते. तसेच विद्यार्थ्यांच्या हातात विविध घोषवाक्य दिसत होती. विद्यार्थी स्वयपूर्तीने नशाबंदी करण्यासाठी मोठ्याने घोषणा देत आक्रोश करत होती. अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे संकल्पनेतून व नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या रॅलीने आजपर्यंतचा श्रीरामपूरातील गर्दीचा उच्चांक मोडला. समाजात घराघरात संदेश पोहोचविण्यासाठी अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस उपअधीक्षक जयदत्त भवर, पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांनी शाळा ,कॉलेजमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन,सोशल मिडिया व विविध स्पर्धांचे आयोजन करून नशा मुक्तीचा संदेश पोहोचविला.
नशा मुक्त अभियान अंतर्गत सी.डी.जे. कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये निबंध स्पर्धा,आर.बी.एन.बी. कॉलेज मध्ये वक्तृत्व स्पर्धा , डी. डी. काचोळे विद्यालय येथे चित्रकला, एस. के. सोमैय्या विद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धा तर भि. रा.खटोड कन्या विद्यालयात घोषवाक्य स्पर्धा संपन्न झाल्या. प्रा.बाबासाहेब शेंडगे व प्रा.योगिता रांधवने यांचे नेतृत्वाखाली आर.बी.एन. बी.कॉलेज विद्यार्थ्यांना नशा मुक्तीवर युवक युवतींचं सुंदर पथनाट्य बसविले होते. सार्वजनिक ठिकाणे, शाळा, कॉलेज, ग्रामीण भागात जाऊन विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ सादरीकरण केले. नागरिकांनी पथनाट्य उस्फुर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या अभिनयाचे कौतुक करून धन्यवाद दिले. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही रॅलीत विद्यार्थ्यांसोबत पायी चालत नशा मुक्त श्रीरामपूर साठी घोषणा दिल्या व विद्यार्थ्यांना प्रोहत्साहन दिले.
पोलिस बॅण्ड विशेष आकर्षण ठरला..
अहिल्यानगर येथील पोलिस बॅण्ड पथकाने रॅलीत देशभक्तीपर गीते गाऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
रॅलीत ३५ शाळा व २० महाविद्यालयाचा सहभाग
यावेळी विविध स्पर्धेचे विजेते विद्यार्थी इलिया घागरे, ईश्वरी मेतकर, कोमल शर्मा, प्रचिती चव्हाण, श्रद्धा काळे, अक्षदा खताळ, पवार वेदिका, उंडे चैतन्य, कर्हाळे प्रांजल, वैष्णवी मनाळ, श्रेया शेळके, गीतांजली व्यवहारे, आराध्या उंडे, दानिश पठाण,प्राची आव्हाड, शेख मिसबा, रोनक अमित, कुंजल गागरे, आसाद शेख, मृणमयी औतडे, श्रावणी सातकर, वैष्णवी कोपरे, राजश्री पांढरे, निर्मिती गुप्ता, अमृता शिंदे, स्नेहल वाघुले, भक्ती कुलथे, स्नेहल मापारे आदी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी नशामुक्त अभियानात विशेष योगदानाबद्दल आर बी एन बी कॉलेज श्रीरामपूर, सी डी जैन कॉलेज श्रीरामपूर, स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र कॉलेज श्रीरामपूर, डी डी काचोळे विद्यालय श्रीरामपूर, एस. के. सोमैय्या प्राथमिक विद्यालय श्रीरामपूर आदींचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक शीतल मुगडे यांनी सर्वांना नशामुक्तीची शपथ दिली. त्यानंतर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी झेंडा दाखवून नशामुक्ती रॅलीचा प्रारंभ केला. शहरातील प्रमुख रस्त्याने रॅली जात असताना विद्यार्थ्यांनी नशा मुक्तीच्या घोषणा देऊन शहर दणाणून सोडले.
जवळपास ४ कि.मी. च्या रॅलीने एका आगळ्या वेगळ्या विषयाने नागरिकाचे लक्ष वेधून घेतले. चौका चौकात रॅलीचे स्वागत करण्यात आले. नशामुक्त अभियान यशस्वी पार पाडण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस उपअधीक्षक कार्यालय, शहर पोलिस स्टेशन श्रीरामपूर, श्रीरामपूर रयत संकुल, तालुक्यातील शाळा व महाविद्यालयाचे संस्थाचालक प्राचार्य व मुख्याध्यापक सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले यावेळी शैक्षणिक संस्थांसह सेवाभावी संस्था, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संस्थेनी उपस्थित होते. श्रीरामपूर पोलीस दलाच्या वतीने विद्यार्थ्यांना बिस्किटे, पिण्याचे पाणी व भोजन व्यवस्था उत्तम करण्यात आली होती.
---------------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111


No comments