adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुक्ताईनगरमध्ये जागतिक छायाचित्रकार दिन उत्साहात साजरा हरताळा येथे निसर्गरम्य वातावरणात पार पडला सोहळा; तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

 मुक्ताईनगरमध्ये जागतिक छायाचित्रकार दिन उत्साहात साजरा हरताळा येथे निसर्गरम्य वातावरणात पार पडला सोहळा; तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांचा उत...

 मुक्ताईनगरमध्ये जागतिक छायाचित्रकार दिन उत्साहात साजरा

हरताळा येथे निसर्गरम्य वातावरणात पार पडला सोहळा; तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग 


प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांनी जागतिक छायाचित्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. हरताळा येथील निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात तालुक्यातील संपूर्ण फोटोग्राफर बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात विधिवत कॅमेरा पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित फोटोग्राफर बांधवांनी एकमेकांना जागतिक छायाचित्रकार दिनाच्या शुभेच्छा देत आनंद साजरा केला. निसर्गाच्या सान्निध्यात पार पडलेल्या या कार्यक्रमात फोटोग्राफर बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. छायाचित्रण क्षेत्रातील विविध अनुभव, आठवणी आणि गप्पांमुळे कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमानंतर सर्व फोटोग्राफर बांधवांनी एकत्रितपणे स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहायला मिळाले. हरताळा येथील निसर्गरम्य वातावरणात पार पडलेला हा सोहळा मुक्ताईनगर तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांसाठी एक संस्मरणीय क्षण ठरला. या निमित्ताने तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांची एकजूट आणि मैत्री अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.

No comments