adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल बसस्थानकातील कार्यक्रमात नगराध्यक्षांचा अपमान केल्याचा शिवसेना उबाठाकडून तीव्र निषेध

  यावल बसस्थानकातील कार्यक्रमात नगराध्यक्षांचा अपमान केल्याचा शिवसेना उबाठाकडून तीव्र निषेध  भरत कोळी यावल  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) य...

 यावल बसस्थानकातील कार्यक्रमात नगराध्यक्षांचा अपमान केल्याचा शिवसेना उबाठाकडून तीव्र निषेध 


भरत कोळी यावल 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल येथील बसस्थानकात आयोजित राजमाता जिजाऊ बससेवा लोकार्पण कार्यक्रमात लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई पाटील यांना डावलून त्यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच शासकीय प्रोटोकॉलचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावल बसस्थानकात रविवारी राजमाता जिजाऊ बससेवेच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांनी नगराध्यक्ष छायाताई पाटील तसेच नगरसेवक अतुल पाटील यांना मोबाईलवर संपर्क साधून निमंत्रण दिले होते. मात्र, प्रत्यक्ष कार्यक्रमात नगराध्यक्षांना योग्य तो सन्मान व स्थान देण्यात आले नसल्याचा आरोप शिवसेना उबाठाकडून करण्यात आला.

या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख शरद बापू कोळी यांनी तातडीची बैठक बोलावली. बैठकीत या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आला. लोकनियुक्त प्रतिनिधींचा सन्मान राखणे तसेच शासकीय कार्यक्रमांमध्ये शासनाच्या प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

“हा केवळ एका व्यक्तीचा अपमान नसून यावल शहरातील नागरिकांचा अवमान”

लोकप्रतिनिधींमध्ये आमदारांनंतर नगराध्यक्षांचे महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे लोकनियुक्त नगराध्यक्षांचा सार्वजनिक शासकीय कार्यक्रमात योग्य सन्मान न होणे हा केवळ एका व्यक्तीचा अवमान नसून यावल शहरातील नागरिकांचा अपमान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

यापुढे यावल शहरातील कोणत्याही शासकीय कार्यालयात किंवा शासकीय कार्यक्रमात लोकनियुक्त नगराध्यक्षांचा योग्य सन्मान राखून शासकीय प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उबाठाच्या वतीने करण्यात आली.

प्रोटोकॉलचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने सडेतोड उत्तर देण्यात येईल, असा इशारा तालुकाप्रमुख शरद कोळी यांनी दिला.

या बैठकीस संतोष खर्चे, पप्पु जोशी, जगदिश कवडीवाले, निलेश बारी, नगरसेविका वैशाली बारी, माजी नगराध्यक्ष सुरेखा कोळी, कडू पाटील यांच्यासह शिवसेना उबाठाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेस, उबाठा व अपक्ष नगरसेवकांकडूनही निषेध

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष छायाताई पाटील यांच्या कार्यालयात काँग्रेस, शिवसेना उबाठा तसेच अपक्ष नगरसेवक एकत्र आले. त्यांनीही या घटनेचा निषेध नोंदवत लोकनियुक्त नगराध्यक्षांचा शासकीय कार्यक्रमांमध्ये योग्य सन्मान राखण्याची मागणी केली.

यावेळी नगरसेवक पराग सराफ, निसार मोमीन, इमाम रजा खान, उपनगराध्यक्ष सईदाबी मो. याकुब, नगरसेविका रूबीनाबी कच्छी, शालुबाई भालेराव, शिला सोनवणे, कमरूनिस्साबी सैफुद्यीन, समीर खान, उमर कच्छी, काँग्रेस शहराध्यक्ष मो. हकीम मो. याकुब यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते.

No comments