adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एलसीबी' ने एकाच दिवशी ६ अड्ड्यांवर धाडी टाकून दारू माफियांना दिला जोरदार दणका..

 एलसीबी' ने एकाच दिवशी ६ अड्ड्यांवर धाडी टाकून दारू माफियांना दिला जोरदार दणका.. सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ​अहि...

 एलसीबी' ने एकाच दिवशी ६ अड्ड्यांवर धाडी टाकून दारू माफियांना दिला जोरदार दणका..


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​अहिल्यानगर :- जिल्ह्यात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आक्रमक पवित्रा घेतला असून पाथर्डी तालुक्यात एकाच दिवशी सलग ६ ठिकाणी छापे टाकत मोठी कारवाई केली आहे.या धडक मोहिमेमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याचे सक्त आदेश दिले होते.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तातडीने विशेष पथक तयार करून पाथर्डी भागात रवाना केले.पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ६ गुप्त अड्ड्यांवर एकाच वेळी छापे टाकले.ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, अभिजीत अरकल,अशोक लिपणे,रणजीत जाधव आणि रोहित येमुल यांच्या पथकाने पार पाडली.पोलिसांच्या या अचानक झालेल्या 'सर्जिकल स्ट्राईक' मुळे तालुक्यातील अवैध धंदे चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

No comments