'तडवी द गाईड' आयोजित जनजातीय गौरव महोत्सवानिमित्त 'ज्ञानदान अभियान' 150 विद्यार्थ्यांना वह्या, स्केच पेन, चित्रकला वही, पे...
'तडवी द गाईड' आयोजित जनजातीय गौरव महोत्सवानिमित्त 'ज्ञानदान अभियान'
150 विद्यार्थ्यांना वह्या, स्केच पेन, चित्रकला वही, पेन्सिल, खोडरबर, रंगपेटी आणि शार्पनरसह शैक्षणिक साहित्य वाटप
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सामाजिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या 'तडवी द गाईड' या संस्थेच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून दिनांक 01 ऑगस्ट पासून जनजातीय गौरव महोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
"चला शिकूया समाजाकडून" या मुख्य उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमांतर्गत ५ ऑगस्ट रोजी "ज्ञानदान अभियान" पार पडले.
या अभियानाचा मुख्य हेतू गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणे हा आहे, आज जिल्हा परिषद उर्दू शाळा केऱ्हाळे बुद्रुक आणि जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा सहस्त्रलिंग ता. रावेर येथे 150 विद्यार्थ्यांना वह्या, स्केच पेन, चित्रकला वही, पेन्सिल, खोडरबर, रंगपेटी आणि शार्पनर यांसारख्या आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
आपले थोडेसे योगदान एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाला नवी दिशा देऊ शकते," या भावनेने समाजातील घटकांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संस्कृती आणि शिक्षणाचा संगम, चित्रकला , वक्तृत्व, नृत्य स्पर्धेचे आयोजन करून आदिवासी संस्कृतीचे जतन, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि रक्तदान यांसारख्या सामाजिक मूल्यांचा प्रचार या महोत्सवातून केला जात आहे.
"ज्ञानदान करून शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया!" असा संदेश देणाऱ्या या स्तुत्य उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन 'तडवी द गाईड' परिवारातर्फे करण्यात आले आहे.
अभियानाच्या यशस्वितेसाठी साठी श्री साईनाथ चन्ने सर, विकास सुरवाडे सर, मुख्या. जि प शाळा सहस्त्रलिंग, शकील मुबारक तडवी, मुख्या. जि प शाळा केऱ्हाळे बुद्रुक, किरण जहाबाज तडवी, सलीम नशीर तडवी, तस्लिम रशीद तडवी, जावेद सिराज तडवी, युनूस शाहदूर तडवी, राकेश हैदर तडवी, आशिफ मुस्तफा तडवी, निसार युसूफ तडवी, अजित हुसेन तडवी, अशफाक जरदार तडवी, आयेशा अशफाक तडवी आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल, भुसावळ येथील विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.


No comments