adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नये - सौ. राखी बिहानी इनर्व्हिल क्लबच्या वतीने अनाथांना मदतीचा हात

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नये - सौ. राखी बिहानी इनर्व्हिल क्लबच्या वतीने  अनाथांना मदतीचा हात  शौकतभाई शेख/ श्रीरामपूर (संपा...

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नये - सौ. राखी बिहानी

इनर्व्हिल क्लबच्या वतीने अनाथांना मदतीचा हात 




शौकतभाई शेख/ श्रीरामपूर

(संपादक : हेमकांत गायकवाड)

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये उत्तुंग यश मिळवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घ्यावे शिक्षणाने आपल्या कुटुंबाचा विकास होईल प्रतिकूल परिस्थिती बदलण्याचे साधन म्हणजे शिक्षण आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या व सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नये असे आवाहन इनर्व्हिल क्लबच्या अध्यक्षा सौ. राखी श्रीनिवास बिहानी यांनी केले 

          येथील रयत शिक्षण संस्थेच्या डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालयात वसतिगृह व रिमांड होम मधील गरजू व निराधार विद्यार्थ्यांना इनर्व्हिल क्लब व श्रीनिवास बिहानी फाउंडेशन च्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना सौ. राखी बिहानी बोलत होत्या.

         प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष सुप्रिया भोसले, सेक्रेटरी डॉ. ऋतू लखोटिया, उषा मुंदडा , पद्मा भुतडा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

      प्रारंभी मुख्याध्यापक सुनील साळवे यांनी श्रीनिवास बिहानी परिवाराच्या दातृत्वाचे कौतुक करून समाजातील गोरगरिबांची सेवा करणारे बिहानी दाम्पत्य समर्पणाचे प्रतीक आहे असे गौरवोद्गार श्री सुनील साळवे यांनी व्यक्त केले.

          गरजू विद्यार्थ्यांना यावेळी स्कूल बॅग्स, पाण्याची बाटली,वह्यांचे वाटप मान्यवर अतिथींच्या हस्ते करण्यात आले.

       सूत्रसंचलन वैजयंती सोनवणे यांनी तर आभार सांस्कृतिक विभागप्रमुख नानासाहेब मुठे यांनी मानले.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

श्रीरामपूर - 9561174111

No comments