जे.ई. स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर : येथील जे.ई. स्कूलम...
जे.ई. स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर
मुक्ताईनगर : येथील जे.ई. स्कूलमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. सी. एस. चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे संचालक रमेश खाचणे, प्राचार्य व्ही. एम. चौधरी, उपप्राचार्या व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक व्ही. डी. बऱ्हाटे, के. आर. कवळे, एस. एम. वाढे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर एनसीसी कॅडेट्सकडून शिस्तबद्ध पथसंचलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त तसेच कॉपीमुक्त शाळेची शपथ देण्यात आली. त्यानंतर एनसीसी, स्काऊट-गाईड आणि आरएसपी पथकाच्या सहभागातून परिसरातून जनजागृती रॅली काढण्यात आली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेला राष्ट्रपुरुषांचा सजीव देखावा. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळवली. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जे.ई. स्कूलमधील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

No comments