सावदा पोलिसांचा ‘रूट मार्च’ ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता, सलोखा व एकोपा राखण्याचे आवाहन मुबारक तडवी रावेर (संपादक -:- हेमकांत ...
सावदा पोलिसांचा ‘रूट मार्च’
ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता, सलोखा व एकोपा राखण्याचे आवाहन
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावदा शहरासह चिनावल व मोठा वाघोदा बुद्रुक येथे सावदा पोलिसांच्या वतीने ‘रूट मार्च’ काढण्यात आला.
सावदा शहर व ग्रामीण भागात शांतता, सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी संवेदनशील भागातून हा रूट मार्च काढला. मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत सावदा, मोठा वाघोदा बुद्रुक आणि चिनावल येथील संवेदनशील परिसरातून पोलिसांनी संचलन केले.
या रूट मार्चमध्ये सावदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस नाईक राहुल सानप, पी.एस.आय. जयाराम खोडपे, पोलीस कर्मचारी के. निलेश बाविस्कर, पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील यांच्यासह २४ पोलीस अंमलदार, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, दंगल नियंत्रण पथकातील (RCP) १२ अंमलदार तसेच ३४ होमगार्ड जवान व महिला कर्मचारी सहभागी झाले होते.
रूट मार्चच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शांतता, सलोखा, एकोपा, बंधुभाव आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
आगामी ईद-ए-मिलाद सण शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा, तसेच सर्व समाजबांधवांनी शांतता, सलोखा व एकोपा कायम ठेवून सण साजरा करावा, असे आवाहन सावदा पोलिसांच्या वतीने करण्यात आले.
रूट मार्चच्या माध्यमातून ‘एकता, बंधुभाव आणि शांतता’ यांचा संदेश देण्यात आला.


No comments