जिल्हा परिषदेच्या सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा! मोठा वाघोदा -मस्कावद जिप शाळांना भेटी - चिनावल आरोग्य केंद्राच्या सोयीसुविधांचा घेतल...
जिल्हा परिषदेच्या सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा!
मोठा वाघोदा -मस्कावद जिप शाळांना भेटी - चिनावल आरोग्य केंद्राच्या सोयीसुविधांचा घेतला आढावा 
जळगाव जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
करिश्मा नायर यांनी मोठा वाघोदा बुद्रुक
जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे भेट
मुबारक तडवी रावेर
संपादक हेमकांत गायकवाड
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेला जळगांव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी आज दि २० ऑगस्ट रोजी अचानक भेट देत उपस्थित
विद्यार्थ्यांशी हितगुज करुन संवाद साधला. निपुण भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शालेय शैक्षणिक उपक्रमांची त्यांनी माहिती जाणून घेतली. विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना पाठ्यक्रम व सामान्यज्ञ वर आधारित प्रश्न विचारून त्यांच्या शैक्षणिक आकलनाची आणि शैक्षणिक प्रगतीचे अवलोकन केले. शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा त्यांनी आढावा घेतला.
यासोबतच त्यांनी मस्कावद येथील जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली. शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची प्रगती, स्वच्छता, मिट डे मील योजनेतील शालेय पोषण आहार माध्यान्ह भोजन व्यवस्थेचा आढावा घेतला.
दरम्यान चिनावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत आरोग्य सुविधांचा रुग्णांना सेवा,औषधोपचार औषध साठा बाबत आढावा घेतला.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अचानक भेट दौऱ्यात रावेर तालुक्यातील प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली रावेर पंचायत समितीच्या सर्व विभाग अलर्ट होऊन ऐन वेळी तारांबळ उडाल्याचे चित्र दिसले मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या अचानक भेट दौऱ्याचे प्रत्येक आठवड्याला सरप्राइज व्हिजीट देऊन प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी अशा भेटी प्रत्येक गांवाना देण्याची मागणी वजा अपेक्षा नागरिकांतून केली जात आहे
वाघोदे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यानंतर करिश्मा नायर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. निपुण भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या आकलनाची आणि शैक्षणिक प्रगतीची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा त्यांनी आढावा घेतला.
No comments