adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सूर्यकन्या तापी माईच्या जलाने हजारो शिवभक्तांच्या गजरात कावड यात्रा संपन्न

  सूर्यकन्या तापी माईच्या जलाने हजारो शिवभक्तांच्या गजरात कावड यात्रा संपन्न  विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दर...

 सूर्यकन्या तापी माईच्या जलाने हजारो शिवभक्तांच्या गजरात कावड यात्रा संपन्न 


विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दरवर्षीच्या पारंपारिक प्रथेप्रमाणे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी कावड यात्रा निघत असते. सुभाष अण्णा चौधरी अध्यक्ष वर्णेश्वर महादेव संस्थान यांच्या संकल्पनेतून १२वर्षांपासून सुरू झालेल्या कावड यात्रेला हजारो शिव भक्त हजर असतात.दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ३ हजाराच्या आसपास शिव भक्तांनी सकाळपासूनच सूर्यकन्या तापी माईचे विधिवत पूजन करून बम बम भोले, हर हर महादेव च्या गजरात कावड मध्ये जल घेऊन प्रस्थान केले. संपूर्ण मार्गावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते, या कावड यात्रेत अमळनेर शहर, रडावन, हेडावे, नंदगाव तासखेडा, सुंदर पट्टी,साने नगर गांधली, अमळगाव येथील शिवभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. जलोद येथे शिवदास सुभेदार, सौ सुनंदा चौधरी यांनी नाश्त्याची व्यवस्था केली होती. तापी नदीच्या पुला वरच हजारो शिवभक्तांना भेटण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड.व्ही आर पाटील, भाजपचे मा. तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, मा. जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई पाटील, निवृत्त डी.वाय.एस.पी. वासुदेव देसले, सौ. तिलोत्तमा पाटील, ॲड.तिलोत्तमा पाटील, श्रीमती माधुरी पाटील, सौ. रिटा बाविस्कर, बहादरपुर चे मा. प्रा. प्रीतम चौधरी, हिंमत पाटील, शिवभक्त हरी भिका वाणी, प्रशांत राणे, मंगळ ग्रह सेवा संस्थानचे बाविस्कर सर, बहिरम सर व इतर ट्रस्टी, अर्बन बँकेचे संचालक मंडळ रणजीत शिंदे, पंकज मुंदडे, लक्ष्मण महाजन, प्रविण पाटील व इतर मंडळींनी शिवभक्तांचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे डॉक्टर पांडुरंग पिंगळे व डॉक्टर मिलिंद पाटील यांनी सर्व शिवभक्तांना वैद्यकीय सेवा दिली. सर्व शिवभक्तांचा अमळगाव येथे आल्यावर  शिवभक्त श्रीराम चौधरी, त्यांच्या धर्मपत्नी सौ.मनिषा श्रीराम चौधरी,देवेश श्रीराम, गौरव श्रीराम यांनी सुग्रास महाप्रसादाचे वाटप केले. राजेंद्र देसले व भावेश चौधरी यांनी अमरनाथ मूर्ती स्थापन करून कावड तयार केली. शेकडो शिवभक्त त्यांच्यासोबत फोटो काढण्यात गुंतले होते रस्त्यावर शिवभक्तांच्या भेटीस किरण पाटील, नरेंद्र चौधरी, चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, प्रवीण पाटील, बडगुजर सर, भूषण भदाने, विक्रांत पाटील, सुरेश अर्जुन पाटील, मनोज पाटील, प्रा.विश्वनाथ ठाकरे, शत्रुघ्न पाटील, सईद तेली यांनी शिवभक्तांचे दर्शन घेतले. श्रीमती माधुरी पाटील यांनी शिवभक्तांना पाणी वाटप केले. निवृत्त पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांनी पाणी वाटप व लाडू वाटप केले. गांधली येथे सरपंच नरेंद्र पाटील ग्रामस्थ गजेंद्र साळुंखे, रोहिदास पाटील यांनी चहा वाटप केले. शिवभक्तांच्या दर्शनासाठी साहेबराव पवार बांधकाम सभापती नगरपरिषद, गोरख पाटील, महेंद्र पवार, देविदास देसले, नगरसेवक पंकज चौधरी, महेंद्र पाटील नगाव, संभाजी पाटील,भगत विजय चव्हाण यांनी केळी वाटप केले. अनेक शिवभक्त आनंदाने चालत होते. कावड यात्रा यशस्वीतेसाठी नारायण बडगुजर, गोविंद दलाल, भिकन वाडीले, सुशील भोईटे, सुभाष पाटील, रडावणचे रवींद्र पाटील, सुंदरपट्टीचे मिठाराम पाटील, साने नगरचे जगदीश पाटील, भास्कर पाटील  सरपंच हेडावे, दामोदर पाटील सरपंच नंदगाव  यांनी कावड यात्रा यशस्वीतेसाठी खूप परिश्रम घेतले. शिवभक्त अशोक पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, हरी भिका वाणी, सुनील राजाराम चौधरी, मंगळ ग्रह सेवा संस्था, खासदार श्रीमती स्मिता वाघ, श्री. संकल्प प्रिंटर्स, अमळनेर अर्बन बँक, विक्रांत पाटील, लालचंद सैनानी, नगराध्यक्ष डॉ.परिक्षित बाविस्कर, पंकज चौधरी, पारस गोल्ड, योगेश मुंदडे, भरत सिंग परदेशी, भावेश जैन, महेंद्र पवार, डॉ.अनिल शिंदे, ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड . हेमंत दादा भांडारकर, सुरेश अर्जुन पाटील, भाजप शहराध्यक्ष योगेश महाजन,सौ. तिलोत्तमा पाटील, महेंद्र महाजन यांनी होर्डिंग्ज लाऊन कावड यात्रा यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

No comments