अंतुर्लीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात बिरसा मुंडा यांना अभिवादन; निर्वाना फाउंडेशनतर्फे आदिवासी पाड्यावर ...
अंतुर्लीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात बिरसा मुंडा यांना अभिवादन; निर्वाना फाउंडेशनतर्फे आदिवासी पाड्यावर विविध सामाजिक उपक्रम
अंतुर्ली ता. मुक्ताईनगर – किरण धायले :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जागतिक आदिवासी दिनानिमित्त अंतुर्ली येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच निर्वाना फाउंडेशनच्या वतीने आदिवासी पाड्यावर जाऊन जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात आयोजित कार्यक्रमात आदिवासी बांधव नितेश रामदास जांभेकर यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. ए. भोई सर, पोलीस पाटील किशोर मेढे, माजी प्राचार्य बी. डी. बारी, शरद महाजन, भाऊराव महाजन, राजू शिरतुरे, अजय भिल्ल, सुमित सिल्वे, महेंद्र चौधरी, प्रकाश कोळी, मिलिंद महाजन, शेख भैय्या शेख करीम, अरविंद पाटील, गणेश पाटील यांच्यासह वाचक, मान्यवर व आदिवासी बांधव उपस्थित होते.
यावेळी एस. ए. भोई सर यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आदिवासी समाजाचा इतिहास हा केवळ संघर्षाचा नसून शौर्य, स्वाभिमान आणि समृद्ध संस्कृतीचा इतिहास आहे. जल, जंगल आणि जमीन यांचे रक्षण करणारा आदिवासी समाज हा निसर्गाचा खरा मित्र आहे. निसर्गाचे संतुलन कायम राखण्याची आदिवासी समाजाची परंपरा प्रेरणादायी आहे.”
आदिवासी समाजाची संस्कृती, भाषा, परंपरा आणि हक्कांचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यावरण संवर्धन, स्वाभिमान, एकता आणि संघर्षाची परंपरा यामध्ये आदिवासी समाजाचे योगदान मोलाचे आहे. स्वातंत्र्यलढ्यातही आदिवासी समाजाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. “शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक अनिल वाडीले, ग्रंथपाल अनिल नावकर आणि किरण धायले यांनी विशेष प्रयत्न केले.
निर्वाना फाउंडेशनतर्फे आदिवासी पाड्यावर उत्साहात कार्यक्रम
दरम्यान, निर्वाना फाउंडेशनच्या वतीने आदिवासी पाड्यावर जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक बिरसा मुंडा, क्रांतिकारक टंट्या भिल्ल तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष व सचिव ॲड. प्रफुल्ल किशोर मेढे यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व विशद केले. आदिवासी समाजातील नागरिक व विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क, अधिकार, शिक्षण तसेच संविधानिक अधिकारांचे महत्त्व समजावून सांगितले. शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी समाजाने प्रगतीच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान राधा भिलाला, आरती बारेला, शिवा भिलाला, गोपाल भिलाला आणि राज बारेला या विद्यार्थ्यांनी आदिवासी गीते सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभय शिरतुरे, अजय मेढे, क्षितिज शिरतुरे, आर्यन मेढे आणि उदय मेढे यांनी विशेष सहकार्य केले.
आदिवासी समाजाचा विकास, शिक्षणाचा प्रसार आणि हक्क-अधिकारांची जाणीव निर्माण करणे ही निर्वाना फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी असून, या उपक्रमातून समाजाला शिक्षण व संघटितपणाचा संदेश देण्यात आला.


No comments