adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वेळोदे येथे शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

  वेळोदे येथे शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश   मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता. चोपडा  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  वेळोदे तालुका चोपडा य...

 वेळोदे येथे शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश  


मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता. चोपडा 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 वेळोदे तालुका चोपडा येथे आज दिनांक २०/८/२०२२ रोजी संध्याकाळी पाच वाजता चोपडा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या उपस्थितीत त्यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून वेळोदे येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळेस सर्व जाती धर्माच्या पुरुष व महिलांसह पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला विश्वास पितांबर चौधरी माजी उपसरपंच, सुभाष उत्तमराव नेरपगारे माजी चेअरमन वि. का. सो. सुभाष बाजीराव सोनवणे माझी शाखा व्यवस्थापक, चंद्रकांत बाबुराव सोनवणे, पुरुषोत्तम नामदेव सोनवणे माजी चेअरमन वि. का. सो. निंबा खंडेराव बोरसे माझी व्हा. चेअरमन वि. का. सो. देविदास बंडू सोनवणे माजी उपसरपंच, आशाताई हुकुमचंद सोनवणे माजी चेअरमन वि. का. सो सुभाष भिला सैंदाणे माझी व्हाईस चेअरमन वि. का. सो. नारायण बोरसे स्वाभिमानी मराठा महासंघ तालुका अध्यक्ष, श्रीमती प्रमिलाबाई प्रल्हाद चौधरी माजी चेअरमन वि. का. सो आधार कोंडाजी चौधरी, 


ज्ञानेश्वर आप्पा सोनवणे, माझी व्हाईस चेअरमन वि. का. सो रामदास चौधरी चेअरमन वि. का. सो अरुण प्रल्हादराव सोनवणे माजी संचालक वि. का. सो. अशोक देवीलाल जयस्वाल, शरद गणपत बोरसे, गुलाब सुभाष कोळी प्रवीण वसंत करंकाळे, नरेंद्र दादाभाई मिथुन सुभाष पाडवी गोपाळ तुकाराम पाटील, भालचंद्र प्रल्हाद चौधरी, डोंगरसिंग रामा पावरा, अनिल लोटन बोरसे, माझी चेअरमन वि. का. सो. जगदीश चंदू सोनवणे संचालक वि. का. सो. यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी संजय बोरसे यांनी प्रास्ताविकेत नदीकाठी संरक्षण भिंत, शेतपानंद रस्ते, कब्रस्तान वॉल कंपाऊंड, खंडेराव महाराज मंदिरासाठी सभा मंडप, बायपास रस्ता कॉम्पिटीकरण शिवकालीन तलाव पुनर्भरण अपूर्ण काम पूर्ण करणे, बौद्ध विहार, पारधी समाज मंदिर ,भोई समाजासाठी मोरेस मातेसाठी सभा मंडळ, व इतर सर्व समाजासाठी सभामंडप, एवढ्या मागण्या केल्या. एडवोकेट शिवराज पाटील यांनी आपल्या मनोगतात माजी आमदार यांनी वेळोदे हद्दीत सुरू केलेल्या फॅक्टरीत एकाही तरुणाला रोजगार दिला नसल्याचे सांगितले. गावातील त्यांच्या कार्यकर्त्यांने पाण्याच्या टाकीचे काम अपूर्ण सोडून पैसे काढल्या बाबतही उल्लेख केला. माननीय आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून महिलांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मिळणाऱ्या लाडक्या बहिणीच्या पैशातून गुळ शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला. गेल्या पाच वर्षात गावासाठी दोन कोटीच्या निधी दिला, व येणाऱ्या कालावधीत केलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तालुक्यातील दहा गावांसाठी पाणीपुरवठा योजना सुरू असून शुद्ध फिल्टर पाणी दिले जाईल असेही त्यांनी सांगितले, हातनुर धरणाच्या पाठचाऱ्यांसाठी 40 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे ती काम सुरू आहे. आजच पंधरा लाखाचे काम वेळ ग्रामपंचायतीला देऊ केल्याचे त्यांनी सांगितले, यावेळी माणसावर खालील मान्यवर उपस्थित होते अॅडव्होकेट शिवराज पाटील संचालक मार्केट कमिटी चोपडा, पियुष चौधरी गट नेता नगरपालिका चोपडा, विकास पाटील, माजी उपनगरअध्यक्ष, रवींद्र पाटील, प्रकाश रजाळे, माजी संचालक सूतगिरणी किरण देवराज संचालक मार्केट कमिटी चोपडा,सुनील बर्डिया, निवृत्ती पाटील, मंगला पाटील महिला आघाडी प्रमुख, स्वाती बडगुजर, अनिता शिरसाठ, शितल देवराज, कल्पना पाटील, स्वाती पाटील, गणेश पाटील सरपंच मालखेडा, कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक पवार, अशोक चौधरी, दादू पारधी, रवींद्र कोळी, मोतीलाल पारधी, त्यांनी प्रयत्न केले सूत्रसंचालन राजू कोळी सर यांनी व आभार प्रदर्शन विजय सोनवणे सर यांनी केले.

No comments