adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे. ई. स्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा उत्साहात प्रसिद्ध मूर्तिकार शिवम अनूप सुतार यांचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक; कला, संस्कृती व पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम

 जे. ई. स्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा उत्साहात प्रसिद्ध मूर्तिकार शिवम अनूप सुतार यांचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक...

 जे. ई. स्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा उत्साहात

प्रसिद्ध मूर्तिकार शिवम अनूप सुतार यांचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक; कला, संस्कृती व पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम 


प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर : जे. ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील कलात्मक कौशल्य विकसित करणे, सर्जनशीलतेला चालना देणे तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणे, हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.

या कार्यशाळेत प्रसिद्ध मूर्तिकार शिवम अनूप सुतार यांनी विद्यार्थ्यांसमोर शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. मूर्ती घडविण्याची पद्धत, त्यातील विविध बारकावे तसेच पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वतःच्या हाताने आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या. 


या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे, संचालक रमेश खाचणे व महेश पाटील यांनी कार्यशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्तींची पाहणी केली आणि त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मूर्तींची आपल्या घरी स्थापना करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणाचे रक्षण, जलप्रदूषण टाळणे आणि निसर्गपूरक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे महत्त्वही त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

यावेळी शाळेचे प्राचार्य विकास चौधरी, उपमुख्याध्यापिका वंदना शिर्के, पर्यवेक्षक विलास बऱ्हाटे, कैलास कव्हळे व संजीव वाढे उपस्थित होते.

कार्यशाळेचे आयोजन कलाशिक्षक हेमंतकुमार बाऊस्कर, अर्चना भोळे व मनोज सुरवाडे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत गणेशमूर्ती निर्मितीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

विद्यार्थ्यांना केवळ मूर्ती निर्मितीचे कौशल्यच मिळाले नाही, तर कला, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम या कार्यशाळेत अनुभवायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणारी ही कार्यशाळा अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी ठरली.

No comments