सण उत्सव शांततेत व कायद्याच्या चौकटीत राहून पार पाडावे:- पो. नि. संदिप पाटील. पाल ता रावेर येथे आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन ...
सण उत्सव शांततेत व कायद्याच्या चौकटीत राहून पार पाडावे:- पो. नि. संदिप पाटील. 
पाल ता रावेर येथे आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील व उपस्थित ग्रामस्थ.
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील पाल येथे रावेर पोलीस स्टेशनच्या पाल दुर क्षेत्र पोलीस चौकी अंतर्गत बैठक आयोजित करण्यात आली होती शांतता कमिटीची बैठक
पाल ता रावेर दि २१/८/२०२६ आगामी येणाऱ्या ईद-ए-मिलादुन्नबी व सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पाल ओ पी येथे शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील होते.
या बैठकीत मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा ईद-ए-मिलादुन्नबी व येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबाबत चर्चा करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "सण- उत्सव हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहेत. ते शांततेत, बंधू भावाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून साजरे करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांन समोर केले.
यावेळी मुस्तफा तडवी यांनी ईद-ए-मिलादुन्नबी या पवित्र सणाविषयी माहिती दिली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस कर्मचारी जगदीश पाटील, ईश्वर चव्हाण, इस्माईल तडवी, गोपनीयाचे चैतन्य नारखेडे, हिरालाल गुमळकर तसेच माजी जि प सदस्या गोमतीताई बारेला, ग्रामपंचायत सदस्य कामिल तडवी, युनूस तडवी, सलीम तडवी, आणि माजी सरपंच अर्जुन जाधव, सरफराज तडवी, हमीद भायखॉ तडवी, सरफराज तडवी, प्रमोद भंगाळे, धनराज पवार, संजय पवार, हबीब तडवी, श्रावण पवार, रघुनाथ चव्हाण, सत्तार तडवी, माजी सरपंच मेहबूब तडवी, पुनमचंद जाधव, सुरेश पवार, अफजल खान व गारबर्डी येथील सरपंच रतन पावरा आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments