चोपडा महाविद्यालयात सद्भावना दिवस उत्साहात साजरा चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, ...
चोपडा महाविद्यालयात सद्भावना दिवस उत्साहात साजरा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा येथील राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) विभागाच्या वतीने सद्भावना दिवस हा सद्भावना शपथ घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला सुरवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विशाल हौसे यांनी भारताचे सातवे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जीवनकार्याचा परिचय स्वयंसेवकांना करून दिला. २० ऑगस्ट रोजी भारताचे माजी आणि सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिवस साजरा केला जातो तसेच देशातील सर्व जाती, धर्म, प्रदेश आणि भाषेच्या लोकांमध्ये परस्पर प्रेम, शांतता आणि भावनिक एकता निर्माण करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे.विविध संस्कृतींच्या लोकांमध्ये सामाजिक सुसंवाद टिकवून ठेवणे आणि समाजातील द्वेष व हिंसेची भावना कमी करणे गरजेचे आहे.मानवी जीवनात संवाद, बंधुभाव, एकता आणि सद्भावना यांचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी रा.से.यो. स्वयंसेविका कु. धनश्री हिने उपस्थित सर्व स्वयंसेवकांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली. कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.बी.सूर्यवंशी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, महाविद्यालयातील शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ.प्रवीण महाजन यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार सहायक महिला कार्यक्रम अधिकारी सहा. प्रा. सुनीता पाटील यांनी मानले

No comments