गलंगी शिवारात गांजाची तस्करी पोलीस चौकीजवळ घटनास्थळी पथक दाखल , ९ किलो १३४ ग्रॅम गांजासह ३ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त चोपडा ग्रामीण पोल...
गलंगी शिवारात गांजाची तस्करी पोलीस चौकीजवळ घटनास्थळी पथक दाखल , ९ किलो १३४ ग्रॅम गांजासह ३ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त
चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई; संशयित तरुण ताब्यात
अशोक कोळी चोपडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : गलंगी ते चोपडा रस्त्यावरील गलंगी शिवारातील पोलिस चौकीजवळ चोपडा ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत ९ किलो १३४ ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत गांजासह बजाज पल्सर मोटारसायकल, मोबाईल व झोला असा एकूण ३ लाख २३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी रिंकेश कुमार सुरेश माधवे (वय २३, रा. बॉर्ड क्रमांक १, रेल्वे गेटजवळ, नांदुरा, जि. बुलढाणा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास गलंगी ते चोपडा रस्त्यावर गलंगी शिवारातील पोलिस चौकीजवळ संशयास्पद हालचाली आढळून आल्याने पोलिसांनी रिंकेश माधवे याची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या ताब्यातील बजाज पल्सर मोटारसायकलवर गांजा आढळून आला.
जप्त केलेल्या गांजाचे वजन ९ किलो १३४ ग्रॅम असून त्याची किंमत २ लाख २८ हजार ३५० रुपये आहे. तसेच ९० हजार रुपये किमतीची बजाज पल्सर मोटारसायकल, ५ हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल व एक झोला असा एकूण ३ लाख २३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोपडा उपविभागासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या फॉरेन्सिक पथकाच्या सहाय्याने गांजाचे वजन करून तो सीलबंद करण्यात आला. असिस्टंट केमिकल अॅनालायझर तुषार पाटील यांच्या मदतीने ही प्रक्रिया करण्यात आली. पोलिस निरीक्षक संजय जयराम सोनवणे यांच्या उपस्थितीत पंच, राजपत्रित अधिकारी व आरोपी यांच्या स्वाक्षरीचे लेबल लावून मुद्देमाल सीलबंद करण्यात आला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल निलेश हिम्मत पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६४/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजा विक्रीच्या उद्देशाने वाहतूक केला जात असल्याचा पोलिसांचा संशय असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शितल वाजे, मॅडम पोलीस कॉन्स्टेबल चेतन महाजन, निलेश पाटील व प्रशांत धुमाळ यांच्या पथकाने केली.

No comments