adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उत्तर महाराष्ट्र विभाग कार्याध्यक्षपदी अबरार मिर्झा यांची नियुक्ती; पत्रकारांच्या हक्कांसाठी प्रभावी नेतृत्वाची जबाबदारी

उत्तर महाराष्ट्र विभाग कार्याध्यक्षपदी अबरार मिर्झा यांची नियुक्ती; पत्रकारांच्या हक्कांसाठी प्रभावी नेतृत्वाची जबाबदारी भडगाव प्रतिनिधी  (स...

उत्तर महाराष्ट्र विभाग कार्याध्यक्षपदी अबरार मिर्झा यांची नियुक्ती; पत्रकारांच्या हक्कांसाठी प्रभावी नेतृत्वाची जबाबदारी



भडगाव प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

पत्रकारांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई या राज्यस्तरीय संघटनेने महाराष्ट्र चौफेरचे संपादक मा. अबरार बेग सरवर बेग मिर्झा यांच्यावर मोठा विश्वास व्यक्त करत त्यांची उत्तर महाराष्ट्र विभाग कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती दि. ०२ ऑगस्ट २०२६ पासून पुढील ११ महिन्यांसाठी करण्यात आली असून, नियुक्तीपत्रावर राज्य कार्याध्यक्ष श्री. प्रविण सपकाळे यांची स्वाक्षरी आहे. ही नियुक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा. वसंतराव मुंडे यांच्या सूचनेनुसार जाहीर करण्यात आली आहे.

पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने सक्रिय राहून समाजहिताच्या प्रश्नांना वाचा फोडणारे तसेच महाराष्ट्र चौफेर या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकहिताची भूमिका मांडणारे अबरार मिर्झा यांच्यावर उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्र विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगरसह विविध जिल्ह्यांतील पत्रकारांना संघटित करणे, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा उभारणे, पत्रकारांच्या समस्या शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविणे, नवोदित पत्रकारांना संघटनेशी जोडणे तसेच संघटनेचा विस्तार करून पत्रकारांमध्ये ऐक्य निर्माण करणे, अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.

संघटनेची उद्दिष्टे, नियम व धोरणांचे पालन करत पत्रकारांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करावे, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे. अबरार मिर्झा यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्रात संघटनेचे कार्य अधिक व्यापक व गतिमान होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या नियुक्तीबद्दल पत्रकार, सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अबरार मिर्झा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत पत्रकारांच्या सन्मान, सुरक्षा आणि हक्कांसाठी ते प्रभावी नेतृत्व करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments