adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आमदार सत्यजित तांबे यांच्या शहरातील विविध शाळांना भेटी सोमैया हायस्कूलला शेड साठी पाच लाख तर एज्युकेशन हायस्कूलला बेंचेस देणार

  आमदार सत्यजित तांबे यांच्या शहरातील विविध शाळांना भेटी सोमैया हायस्कूलला शेड साठी पाच लाख तर एज्युकेशन हायस्कूलला बेंचेस देणार  श्रीरामपूर...

 आमदार सत्यजित तांबे यांच्या शहरातील विविध शाळांना भेटी

सोमैया हायस्कूलला शेड साठी पाच लाख तर एज्युकेशन हायस्कूलला बेंचेस देणार 


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नाशिक पदवीधर मतदार संघाचे विद्यमान युवा आमदार सत्यजितदादा तांबे यांनी काल श्रीरामपूर शहरातील विविध शाळा तसेच नगरपालिकेला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळांचे तसेच शिक्षकांचे विविध प्रश्न समजावून घेतले.नगरपालिकेत नगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह उपस्थितांशी हास्यकल्लोळ करीत त्यांनी श्रीरामपूर आणि संगमनेर नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. काल सकाळी नऊ वाजता सुरू झालेला त्यांचा हा संवाद दौरा सायंकाळी साडेचार वाजता समाप्त झाला.

सकाळी प्रथम रयत शिक्षण संस्थेच्या खंडाळा शाळेत त्यांनी भेट दिली. त्यानंतर डहाणूकर विद्यालय, डिपॉल विद्यालय, डीडी काचोळे विद्यालय, भि.रा. खटोड कन्या विद्यालय, समय हायस्कूल, मॉडेल हायस्कूल, श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, विद्यानिकेतन हायस्कूल, प्रगती इंग्लिश मीडियम स्कूल, अशोकनगर व शिरसगांव हायस्कूल आदी ठिकाणी भेटी दिल्या. या भेटीदरम्यान त्यांनी शाळांचे शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे प्रश्न समजावून घेतले, काही प्रश्नांबाबत संबंधितांना फोन कॉल करून योग्य ते निर्देश दिले. २०१० पूर्वीच्या शिक्षकांना टीईटी ची अट असू नये अशी मागणी सर्व ठिकाणी करण्यात आली. याबाबत शासनाकडे प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

सोमैया हायस्कूलला बाहेर शेड साठी निधीची मागणी स्कूल कमिटीचे चेअरमन संजय छल्लारे यांनी केली, तेव्हा पाच लाख रुपये या कामासाठी देण्याचे त्यांनी घोषित केले. यावेळी हिंद सेवा मंडळाचे सचिव संजय जोशी, मुख्याध्यापिका गाडेकर मॅडम व शाळेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते. बालिका शाळेत स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन अनुघा देशपांडे व प्रशासकीय अधिकारी दत्तात्रय साबळे यांनी त्यांचे स्वागत केले. श्रीरामपूर एज्यूकेशन सोसायटीमध्ये संस्थेचे अध्यक्ष राम टेकावडे यांनी स्वागत केले यावेळी शिक्षकांनी शाळेसाठी बेंचेस देण्याची मागणी केली ती त्यांनी मान्य केली. मॉडेल स्कूलमध्ये प्राचार्य गुलाटी यांनी त्यांचे स्वागत केले त्यावेळी शाळेने शहरात सर्वप्रथम मुलांसाठी बसविलेल्या स्पॉट ट्रेकर मशीन ची पाहणी केली.सर्व शाळांना आपल्या परीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले सर्व ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला.

श्रीरामपूर नगरपालिकेत त्यांनी नगराध्यक्ष करण ससाणे यांचा सत्कार केला तर नगरपालिकेतर्फे त्यांचाही सत्कार करण्यात आला .यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे,काँग्रेस पक्षाचे गट नेते मुझफ्फर शेख, नगरसेवक दीपक वमने, जावेद शेख, रितेश एडके, तालुका काँग्रेस अध्यक्ष भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, रवी भांबारे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा यांच्या मातोश्री चे नुकतेच निधन झाल्याने आमदार तांबे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.

दुपारी संगमनेर रोडवरील व्हीआयपी रेस्ट हाऊस याठिकाणी शहरातील विविध शिष्टमंडळे व नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांनी निवेदने स्वीकारली तसेच त्यांचे प्रश्न समजावून घेतले. यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार यांनी संजयनगर परिसरातील शाळा क्रमांक ९ च्या इमारतीसाठी जिल्हा नियोजन व विकास समीतीकडून एक कोटी रुपये निधी मिळवून देण्याची मागणी करणारे निवेदन आमदार तांबे यांना दिले. आमदार तांबे यांच्या या दौऱ्यात त्यांचे समवेत शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण,संपर्क अधिकारी गणेश गुंजाळ, गोपाळ जोशी, शिंदे सर,कार्लस साठे सर,दीपक कदम, योगेश आसने आदी सहभागी होते.

त्यांनी भेटी दिलेल्या सर्व ठिकाणी बोलताना वक्त्यांनी आमदार सत्यजित तांबे यांच्या अभ्यासपूर्ण शैलीचा तसेच विधान परिषदेतील त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांचा आवर्जून उल्लेख केला. श्रीरामपूरशी माझे जुने ऋणानुबंध असून श्रीरामपूरला यायला मला नेहमीच आवडते असेही  त्यांनी शेवटी सांगितले.

---------------------------------------------

वृत्त विशेष सहयोग

ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण 

---------------------------------------------

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments