adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

माझे गावं आरोग्य संपन्न गाव अभियान ! प्राथमिक उपकेंद्र मोरव्हाल येथे जागतिक डास निर्मुलन दिवस साजरा. गपिमासे पैदास केंद्र उभारले

 माझे गावं आरोग्य संपन्न गाव अभियान ! प्राथमिक उपकेंद्र मोरव्हाल येथे जागतिक डास निर्मुलन दिवस साजरा;  गपिमासे पैदास केंद्र उभारले   मुबारक ...

 माझे गावं आरोग्य संपन्न गाव अभियान ! प्राथमिक उपकेंद्र मोरव्हाल येथे जागतिक डास निर्मुलन दिवस साजरा; गपिमासे पैदास केंद्र उभारले 


 मुबारक तडवी रावेर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अमोल भंगाळे व लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ कीर्ती भामरे मॅडम डॉ.रिजवान शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक श्री महेमुद तडवी, श्री ङि.के.नमायते आरोग्य निरिक्षक यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र लोहारा येथून माझे गाव आरोग्य संपन्न होण्यासाठी गपिमासे पैदास केंद्र कशा पद्तीने तयार करावे याबाबत आरोग्य सेवक योगेश कापडणे यांना मार्गदर्शन केले. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.चेतन चिमणकर यांनी डास दिवसाचा इतिहास सांगितला दरवर्षी २० ऑगस्ट रोजी १८९७ मध्ये सर रोनाल्ड रॉस यांनी मादी ॲनोफिलीस डास मानवांमध्ये मलेरिया पसरवतो. या ऐतिहासिक शोधाच्या स्मरणार्थ आणि डासांमुळे होणाऱ्या आजारांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. डासांमुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका आणि पिवळा ताप यांसारखे प्राणघातक आजार होतात.

 प्रतिबंधानात्क उपाय आरोग्य सेवक योगेश कापडणे डास टाळण्यासाठी मच्छरदाणी किंवा डास क्रिम वापरा.परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. असे आव्हान आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले डॉ चेतन चिमणकर, आरोग्य सेवक योगेश कापडणे, बी एफ राठोड, गारखेडा उपकेंद्राचे आ.सेवक फिरोज तडवी आ.सेविका पूजा नेवे, यांनी गपिमासे पैदास केंद्र उभारले 

कंटेनर सर्वेक्षण करून पाणी साठविण्याची भांडी, टाक्या, कुलर, टायर, नारळाच्या करवंट्या, फुलदाण्या व इतर पाणी साचणाऱ्या वस्तींची तपासणी करून डासांच्या अळ्या आढळल्यास त्या तात्काळ नष्ट करण्यात आल्या. नागरिकांना डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.

आशा सेविकांनी घरभेटी घेऊन तापग्रस्त व्यक्तींची माहिती संकलित केली, नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन केले तसेच स्वच्छता व डास नियंत्रणाबाबत जनजागृती करण्यात सक्रिय सहभाग नोंदविला.

 डास प्रतिबंधासाठी : घर व परिसर स्वच्छ ठेवा. पाणी साचू देऊ नका. पाण्याची भांडी झाकून ठेवा. आठवड्यातून एक दिवस "ड्राय डे" पाळा. ताप आल्यास त्वरित जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधा.

"स्वच्छ परिसर, निरोगी कुटुंब – डास मुक्त गावासाठी सर्वांनी सहकार्य करूया."असा संदेश ग्रामस्थांना देण्यात आला

No comments