गौर्यापाडा ता चोपडा येथे कृषी विज्ञान केंद्र पाल ता.रावेर तर्फे आयोजित आदिवासी शेतकरी मेळावा संपन्न विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकां...
गौर्यापाडा ता चोपडा येथे कृषी विज्ञान केंद्र पाल ता.रावेर तर्फे आयोजित आदिवासी शेतकरी मेळावा संपन्न
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गौर्यापाडा ता. चोपडा येथे सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल (जळगाव १) ता. रावेर जि.जळगाव यांच्यावतीने भारतीय कृषी अनुसंधान परिषद(ICAR) अंतर्गत आदिवासी उपयोजना (टीएसपी) अंतर्गत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. व याप्रसंगी कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या शेतात आम्रवृक्षाचे रोपण करण्यात आले श्रावण महिन्याच्या औचित्य साधून श्रावण बारेला नावाच्या बालकाकडून आंब्याच्या कलमी रोपे रोपण करून अनोख्या पद्धतीने शेतकरी मेळावा साजरा करण्यात आला. त्यासोबत 100 शेतकऱ्यांना प्रत्येकी 10 रोपे प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार चोपडा थोरात होते .उपस्थित ता. कृषी विभागातून मंडळ अधिकारी जाधव कृषीपरिवेक्षक चेतन साळुंखे व भारतीय कृषी अनुसंधान संस्था दिल्ली (ICAR) पुरस्कार प्राप्त शेतकरी बालमुकुंद महाजन चुंचाळे कार्यक्रमास उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ महेश महाजन डॉ.नेहते प्रा. कापगते प्रा.पाटील यांनी शेतीपूरक व्यवसायाच्या संदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी तहसीलदारांनी परिसरातील उपस्थित शेतकऱ्यांनी पोखरा या शासकीय योजनेचे लाभ घेऊन शेतीत तंत्रज्ञानाचा अवलंबन करण्याचे आवाहन करून शेतीचे शाश्वत महत्व संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी गौर्यापाड्याचे गाव पोलीस पाटील रामलाल पावरा उपसरपंच दारासिंग पावरा अंमलवाडीचे माजी सरपंच दानसिंग पावरा उमटीचे माजी सरपंच राजू पावरा. कालसिंग पावरा काशीराम पावरा सुभाष बारेला अरुण बारेला वीरसिंग पावरा शिवराम पावरा राहुल बारेला रेमसिंग पावरा अपसिंग बारेला साई सिंग बारेला प्रकाश बारेला असे आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम सहाय्यक युवराज कोळी यांनी केले व उपस्थितांचे आभार प्रा. कापगते यांनी मानले.

No comments