मोठा वाघोदा येथे ईद ऐ मिलाद उन नबी निमित्त भव्य जुलूस : सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या आवाहनाला मुस्लिम समाज बांधवांचा प्रतिसाद डीज...
मोठा वाघोदा येथे ईद ऐ मिलाद उन नबी निमित्त भव्य जुलूस :
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या आवाहनाला मुस्लिम समाज बांधवांचा प्रतिसाद डीजेमुक्त मिरवणूक!
पाऊसाकरीता ईदगाह वर सामुहिक प्रार्थना आणि वरुण राजा बरसला.
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
प्रेषित हजरत मोहम्मद मुस्तफा सल्ललाहो अलैह वसल्लम यांचा योमे विलादत म्हणजेच जन्मदिवस १५०१ व्या जन्मदिनी ईद मिलाद उन नबी निमित्त मोठा वाघोदा बुद्रुक येथे मोठ्या आनंदाने मिरवणुक काढण्यात आली रजा कॉलनी व आयेशा मस्जिद परिसरातून या जश्ने ईद-ए-मिलादूनबी सणाच्या जुलूस ला सुरुवात झाली जुलूस मध्ये साधे लाऊडस्पिकर चा वापर करून नातशरीफ,कलमा पठण करीत गावातील मुख्य चौकातून बसस्थानक मार्गाने ईदगाह वर मिरवणूकीचे समापण करण्यात आले.
मुस्लिम बांधवांची पाऊसाकरीता सामुहिक प्रार्थना केली आणि ईद मिलाद उन नबी मिरवणूकीचे समापना नंतर वरुण राजा ही बरसला रिमझिम पाऊस सुरू झाला
सावदा पोलीसांच्या आवाहनाला मुस्लिम समाज बांधवांचा प्रतिसाद,
सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पांडुरंग फड यांनी शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित मुस्लिम समाज बांधवांना डीजेमुक्त मिरवणुक काढण्याचे आवाहन केले आणि सपोनि गणेश फड यांच्या आवाहनाला मुस्लिम बांधवांनी दुजोरा देत डीजेचा वापर न करण्याचा निर्णय घेतला व मिरवणुकीत साध्या लाऊडस्पिकरचा वापर करून नातशरीफ पठण केले व पोलीस प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन केले
मिरवणुकीत शांतता सलोखा एकता बंधूता भाईचारा व एकतेचे दर्शन घडले मुस्लिम पंच कमेटी ने कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पांडुरंग फड उपनिरीक्षक राहुल सानप एएसआय विनोद पाटील, पोहे कॉ सिकंदर तडवी पो हे कॉ निलेश बावस्कर, गोपनीय शाखेचे पो हे कॉ राजेंद्र बोदडे पो कॉ मयुर पाटील,पो कॉ, रविंद्र महाजन,पो कॉ विनोद तडवी आदिसह गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला


No comments