धर्मवीर यूथ फाउंडेशनच्या वतीने पद नियुक्त्या व असंख्य युवकांचा प्रवेश अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर : हिंदुस्...
धर्मवीर यूथ फाउंडेशनच्या वतीने पद नियुक्त्या व असंख्य युवकांचा प्रवेश
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : हिंदुस्थान हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री. शिवाजी महाराज व हिंदू धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज यांच्या प्रेरणेतून धर्मवीर यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून मलकापूर तालुक्यात पद नियुक्त्या तसेच युवकांचा संघटनेत प्रवेश कार्यक्रम उत्साहात पार पडला.
फाउंडेशनचे संस्थापक मा. पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा प्रमुख ओम अजय टप व तालुका प्रमुख देवा बावस्कार यांच्या नेतृत्वाखाली विविध पदांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.यावेळी मलकापूर तालुक्यातील अनेक युवकांनी धर्मवीर यूथ फाउंडेशनमध्ये जाहीर प्रवेश करून संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.हिंदू संस्कृतीचे रक्षण, युवकांचे संघटन आणि सामाजिक कार्याला प्राधान्य देत संघटनेचे कार्य गावागावात पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसह संघटनेत प्रवेश केलेल्या सर्व युवकांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
“हिंदुत्व हेच अस्तित्व, हिंदू संस्कृतीचे रक्षण हेच कर्तव्य” या विचाराने धर्मवीर यूथ फाउंडेशनचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.


No comments