adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मनवेल येथे टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत ग्रामस्तरीय जनजागृती

 मनवेल येथे टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत ग्रामस्तरीय जनजागृती  भरत कोळी यावल (संपादक -:- मंडळ जळगाव)  यावल : साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रांत...

 मनवेल येथे टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत ग्रामस्तरीय जनजागृती 


भरत कोळी यावल

(संपादक -:- मंडळ जळगाव)

 यावल : साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शिरसाड उपकेंद्राच्या वतीने मनवेल येथील अंगणवाडीत टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत ग्रामस्तरीय जनजागृती, नियोजन व चर्चा सभा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश चौधरी होते. यावेळी ग्रामपंचायत प्रशासक जयसिंग सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील, आरोग्य निरीक्षक नितीन वाळूंज, आरोग्य सेवक राजेश्वर निकुंभ, सरदार कनाशा, आशा स्वयंसेविका रंजना कोळी, पुनम पाटील, ज्योती मोरे, ग्राम पंचायत कर्मचारी गणेश पाटील,अंगणवाडी सेविका ज्योती इंधाटे व वेदिका पाटील उपस्थित होते.

सभेत क्षयरोगाची लक्षणे, रुग्णांचा सक्रिय शोध, वेळेवर तपासणी, पूर्ण उपचार, निक्षय योजना, पौष्टिक आहार तसेच स्वच्छतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश चौधरी यांनी मनवेल गावाला टीबीमुक्त करण्यासाठी नागरिकांनी आरोग्य विभागाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, तसेच क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले.

No comments