दहा ऑगस्ट पर्यंत भविष्य निर्वाह निधीचे पैसे शिक्षकांच्या खात्यावर जमा न झाल्यास पंधरा ऑगस्ट पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा इदू पिंजारी ...
दहा ऑगस्ट पर्यंत भविष्य निर्वाह निधीचे पैसे शिक्षकांच्या खात्यावर जमा न झाल्यास पंधरा ऑगस्ट पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव -वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक जळगाव कार्यालयात जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांच्या विविध कामांचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. या कामांकडे आपल्या कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असून या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकांबराच्या कर्मचारी यांची अडवणूक होत आहे. आपल्या कार्यालयाचे व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे परस्पर समन्वय नसल्याने जिल्ह्यातील शिक्षकांना वेठीस धरले जात आहे. ही बाब योग्य नाही. याबाबत आपणास बऱ्याच वेळा फोन द्वारे संपर्क केलेला असूनही सेवानिवृत्त शिक्षकांचे चेंज डिटेल्सची कामे, जन्म तारखेची कामे, माहे एप्रिल/ मे महिन्यात सेवानिवृत्त शिक्षकांचे पी एफ चे अंतिम देयके व परतावा ना परतावा देयके प्रलंबित आहेत.काही ठराविक शिक्षकांचे मात्र देयके आपल्या कार्यालयातून विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली आहे ही बाब योग्य नाही. माहे मार्च २०२६ पासून आपल्या कार्यालयात दाखल झालेली देयके व पारित केलेले देयके यांची तारीख वार सविस्तर माहिती आम्हास मिळावी. तसेच आपल्या कार्यालयाच्या दप्तर दिरंगाई मुळे सेवानिवृत्त शिक्षकांच्या अंतिम पी एफ प्रस्तावाच्या रकमेवर व्याज मिळावे अशी आमची मागणी आहे. आम्ही या पत्राद्वारे विनंती करतो की आपण येत्या १० ऑगस्ट २०२६ पर्यंत आपल्या कार्यालयातील प्रारंभ कामांचा मागण्यांचा निपटारा न केल्यास दि.१५ ऑगस्ट २०२६ पासून माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात येईल. सदर सुचना या पत्राद्वारे आपणास देण्यात येत आहे अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचे सेक्रेटरी शालिग्राम भिरुड यांनी वेतन अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी जळगाव यांना दिले.
याप्रसंगी एस डी भिरुड अजित पाटील, अरुण सपकाळे ,डी ए पाटील, गोपाळ पाटील, गोपाळ महाजन, किरण झांबरे, एस एल पाटील , ललित कुमार फिरके,जयंत चौधरी, बाळासाहेब पाटील, दिगंबर पाटील, गिरीश भारंबे, सिद्धेश्वर वाघुळदे , जे पी सपकाळे ,शिवचरण उज्जेनकर , संदीप डोलारे , आर आर धनगर,एल एस तायडे ,चंपालाल चौधरी, योगेश भोईटे संभाजी अस्वार, महेंद्र पवार, सुनील तायडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
निवेदन देते प्रसंगी वेतन व भविष्य निर्वाह निधी अधीक्षक दिलीप पवार यांनी ४९ शिक्षकांचे बारा कोटी सत्याहत्तर लाख चवरेचाळीस हजार एकशे पंचेचाळीस रुपयेचा चेक आज बॅंकेत जमा करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.
मार्च, एप्रिल, मे व जून या चार महिन्याची एकूण रुपये त्रेपन्न कोटी एकोणीस सत्तर लाख एकोणसत्तर हजार सहाशे अठरा रुपये रकमेची २२६ प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. कार्यालयाने मार्च पासून फक्त ५० शिक्षकांची बीले अदा केली आहे परंतु फक्त एकाच शिक्षकाची रक्कम प्रत्यक्ष खात्यावर जमा झालेली आहे.ही कोट्यावधी रुपयाची प्रकरणे प्रलंबित असून ती दहा ऑगस्ट २०२६ पर्यंत व्याजासह कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे सेक्रेटरी शालिग्राम भिरुड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

No comments