adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गणपूरच्या पीएम श्री शाळेत स्वच्छतेचा जागर; विद्यार्थ्यांनी घेतला परिसर स्वच्छतेचा ध्यास संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन; शाळेसह बाह्य परिसराची सामूहिक स्वच्छता

 गणपूरच्या पीएम श्री शाळेत स्वच्छतेचा जागर; विद्यार्थ्यांनी घेतला परिसर स्वच्छतेचा ध्यास संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन; शाळेसह बाह्य परि...

 गणपूरच्या पीएम श्री शाळेत स्वच्छतेचा जागर; विद्यार्थ्यांनी घेतला परिसर स्वच्छतेचा ध्यास

संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन; शाळेसह बाह्य परिसराची सामूहिक स्वच्छता 


विश्राम तेले  चौगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

  गणपूर  ता.चोपडा :- येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळेत स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी शालेय परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. शिक्षक, पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे पुढाकार घेत शाळेचा परिसर तसेच शाळेबाहेरील परिसराची स्वच्छता केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसरातील कचरा, पालापाचोळा तसेच इतर अनावश्यक वस्तू हटवून परिसर स्वच्छ केला.

यावेळी सरपंच भूषण गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मनीषा पाटील, सदस्य अमृत पाटील, संजय पाटील, दगा पाटील, बाबूराव पाटील यांच्यासह शिक्षक किशोर पाटील, जयवंत पवार, भिका चौधरी, रमेश पाटील, लुधा पावरा, नीता शिंपी, संगीता पवार, वृशाली पाटील तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

स्वच्छता ही केवळ एका दिवसाची जबाबदारी नसून ती दैनंदिन जीवनाचा भाग बनविणे गरजेचे आहे, असे सांगत विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून देण्यात आले. परिसर स्वच्छ ठेवल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, तसेच स्वच्छ वातावरणामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पाटील यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी भिका चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

छायाचित्र ओळ : गणपूर (ता. चोपडा) येथे शालेय परिसराची स्वच्छता करताना पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी.

No comments